BREAKING NEWS

बिलोली शहरात विविध ठिकाणी डाँ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी 

BY   Posted On : 22 Apr 2017 89

भारतरत्न डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२६ व्या जयंती निमित्त बिलोली शहरात ठिकठिकाणी अभिवादन करून मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्यात आली.

अल ईम्रान प्रतिष्ठाण व सार्वजनिक जयंती महोत्सव समितीच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त तहसिल कार्यालयासमोर अभिवादन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाच्या सुरूवातीस डाँ.बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात येऊन सामुहिक धम्म वंदनेचा कार्यक्रम घेण्यात आला.यावेळी न.पा चे उपाध्यक्ष मारोती पटाईत,पोलिस निरिक्षक सुरेश दळवी,वैद्यकीय अधिकारी डाँ.नागेश लखमावार, माजी नगराध्यक्ष भिमराव जेठे,संतोष कुलकर्णी,नगरसेवक अनुप अंकोशकर,प्रकाश पोवाडे,लक्ष्मण शेट्टीवार,जावेद कुरेशी,शाहेद बेग,प्रेस फोरमचे अध्यक्ष सुनिल कदम,म.रा म चे अध्यक्ष वल्लीयोद्दीन फारूखी,भ्रष्टाचार निर्मुलन समितीचे विभागीय अध्यक्ष राजू पा.शिंपाळकर यांच्यासह पञकार,विविध पक्षाचे पदाधिकारी,कर्मचारी,सामाजिक कार्यकर्ते,व्यापारी व नागरिकांची उपस्थिती होती.यावेळी उपस्थित मान्यवरांचा पुष्पहाराने सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अल ईम्रान प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.मोहसिन खान,शिवराज रायलवाड,सार्वजनिक जयंती महोत्सव समितीचे महेंद्र गायकवाड,बालाजी नरहरे आदींनी परिश्रम घेतले.या कार्यक्रमासह शहरातील आंबेडकर नगर येथील समाज मंदिर,नविन बस स्थानकासमोरील अँटो स्टँड,देशमुख नगर सर्व शासकीय कार्यालये,शाळा ,महाविद्यालये इत्यादी ठिकाणी डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली.

Tag:
Back to Top