BREAKING NEWS

महामानव बाबासाहेबांना १२६ व्या जयंतीनिमित्त ठिकठिकाणी अभिवादन

BY   Posted On : 22 Apr 2017 167

शहरासह तालुकाभरात बौद्धीसत्व, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब यांच्या १२६ व्या जयंतीनिमित्त ठीक - ठिकाणी पंचशील ध्वजाचे रोहण करून तैलचीत्राची भव्य मिरवणुक काढून अभिवादन करण्यात आले.

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती निमित्ताने तालुकाभरातील बौद्ध बांधवानी विविध कार्याक्रमाचे आयोजन करून निळी सलामी देत अभिवादन केले. त्यानिमित्ताने शहरातील मुख्य रस्त्यावरून भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली होती. डीजेच्या तालावर चाललेल्या भिमगीतांच्या सुरावर युवकांनी ठेका धरला होता. तर ठीक ठिकाणी राजकीय नेते व बाबासाहेबांना मानणाऱ्या सर्वच कार्यकर्त्यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून आदरांजली वाहिली. तसेच येथील श्री परमेश्वर मंदिर मैदानात भाजपचे तालुकाध्यक्ष विजय नरवाडे यांच्या वतीने शोभा यात्रेत सामील झालेल्या अनुयायांना थंड शुद्ध पेयजलाचे वितरण करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले. यावेळी त्यांच्यासोबत हिदायत खान, खंडू चव्हाण, राम सूर्यवंशी, विलास सूर्यवंशी, शे.इस्माईल, यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच येथील व्यापारी गोविंद बंडेवार यांच्यावतीने सुद्धा मिरवणुकीत सामील झालेल्या महिला - पुरुषांना थंड पेयजल वितरित करण्यात आले. ठिकठिकाणी बाबासाहेबांच्या प्रतिमेला अनेकांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या शोभा यात्रेत नगरसेविका लक्ष्मीबाई भवरे, शाहीर बळीराम हनवते, सुभाष दारवांडे, भीमराव मुनेश्वर, दीपक सोनसळे यांच्यासह भीम जयंती मंडळाचे पदाधिकारी, सदस्य व कार्यकर्ते महिला, पुरुषांनी मिरवणुकीत सहभाग घेतला होता.

याच बरोबर शहरातील प्राथमिक आरोग्य केंद्रात शेळके यांनी अभिवादन केले. तर नगरपंचायतीत नगराध्यक्ष अ.अखिल अ.हमिद यांनी बाबासेह्बांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केले. त्याचा बरोबर तालुक्यातील टेंभी, सरसम बु., खडकी बा., सिरंजनी, कामारी, एकंबा, पवना, जवळगाव, आन्देगाव, बोरगडी, मंगरूळ, सवना, पोटा, दुधड, आदींसह तालुक्यातील ठीक ठिकाणच्या सर्वच गावात मोठ्या उत्साहात निळ्या पाखरांनी शुभ्र वस्त्र परिधान करून बाबासाहेबांच्या तैलचित्राची भव्य मिरवणूक काढली आणि क्रांतीसुर्याला निळी सलामी देत अभिवादन करण्यात आले.

Tag:
Back to Top