BREAKING NEWS

श्री शुक्रताल येथे झालेल्या भागवत कथेच्या प्रसारणास सुरुवात

महाराष्ट्रातील एक हजार भाविकांच्या उपस्थितीत

BY   Posted On : 22 Apr 2017 41

महाराष्ट्रातील सुमारे एक हजार भाविकांच्या उपस्थितीत श्री संत साधू महाराज सेवा समितीच्यावतीने उत्तर प्रदेशातील श्री शुक्रताल येथे ४ ते १० फेब्रुवारीपर्यंत झालेल्या भागवत कथेचे प्रसारण १४ एप्रिलपासून दाखवण्यास सुरुवात झाली असून हे प्रसारण २२ एप्रिल २०१७ पर्यंत पुढील चॅनलवर दुपारी 3 वाजल्यापसून ते सायंकाळी ६.४० पर्यंत दाखवण्यात येणार आहे, अशी माहिती नंदकुमार गादेवार (पुणे) यांनी दिली.

श्री. गोविंद गिरीजी महाराज यांनी त्यांच्या अमोघ वाणीतून श्रीमद् श्री भागवत कथा सांगितली, या भागवत कथेच्या प्रसारणाचा भाविकांनी याचा लाभ घ्यावा. अशी विनंती करण्यात आली आहे. डि. टी. एच., टाटा स्काय - १०७६, व्हिडिओकॉन- ४९५, एरटेल- ६८९, डिश टी. व्ही -१०८१, डि.डि फ्री डिश-31, केबल नेटवर्क, हॅथवे केबल- ८२८ (पूर्ण भारत), सिटी केबल-५५२ बिहार), हॅथवे केबल- ७३३ (कर्नाटक), इन केबल-५०२ (पूर्ण भारत), युसीएन केबल-६१६ (महाराष्ट्र), हरिद्वार केबल-६५, एस. आर. केबल- ४६५ (एम. पी.), एसएमसी नेटवर्क-५५७, फास्टवे केबलl-८०५ (मथुरा, वृंदावन), महाराजा केबल- ३५८,२५२,९५१,३५३ (राजस्थान), लाइव्ह टी. व्ही, जिओ टी. व्ही. WWW.NAVGRAH.TV.
श्री शुक्रताल येथील कार्यक्रमाचे नियोजन नंदकुमार गादेवार (पुणे), प्रल्हाद काशेटवार (कहाळेकर-नांदेड), दिलीप तेललवार (भोकर), सुर्यकांत चालीकवार (कंधार), महेश पत्तेवार (उमरखेड) आदी संयोजकांनी केले होते.

Tag:
Back to Top