BREAKING NEWS

आता पळसपूरच्या पकाल पेंडावरून रेतीची तस्करी सुरु..

BY   Posted On : 22 Apr 2017 250

विदर्भ - मराठवाड्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या पैनगंगा नदीच्या पात्रात इसापूर धरणाचे पाणी सोडल्याने पुढील भागात पाणी आले आहे. त्यामुळे रेतीतस्करांनी आपला मोर्चा पळसपूर गावानजीकच्या पकाली पेंडाकडे वळविला असून, रात्रंदिवस बेसुमार पद्धतीने रेतीचा उपास करून शासनाला गंडविले जात आहे.

येथून सुरु असलेल्या रेती तस्करीची माहिती संबंधित तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांना असताना राजकीय वरदहस्त असलेल्या रेती माफियांना अभय देत आपला स्वार्थ साधून घेत असल्याचा आरोप नागरीकातून केला जात आहे. गेले अनेक महिन्यापासून माणकेश्वर पेंडवरून वाळूचा उपसा करून मोठं मोठे खड्डे झाल्यानंतरही महसूल विभागाने याची पाहणी तर केलीच नाही उलट रेती तस्करांना अभय देऊन साठेबाजी करण्यासह रेतीच्या गोरखधंद्याला अभय दिल्याचे नागरिक सांगत आहेत. त्यामुळे या भागात साठवून रहाणारे पाणी पूर्णतः आटून गेल्याने नदीकाठावरील गावकर्यांना पाणी टंचाईच्या तीव्र झळा सोसाव्या लागत आहेत. अश्या प्रकारे शासकीय संपत्तीची चोरी करून पर्यावरणाला बाधा पोचविणाऱ्या रेती तस्करावर व त्यांना सहकार्य करणारया संबंधितांवर पोलीस कार्यवाही करून शासनाच्या मालमत्तेचे रक्षण करावे. आणि या भागातून कायम रेती उपश्याला बंदी घालण्यासाठी जिल्हाधिकारी महोदयांनी रेती तस्करांना मोका लावावा अशी मागणी टंचाईने त्रस्त झालेल्या नदीकाठावरील गावच्या महिला मंडळीतून जोर धरू लागली आहे.

Tag:
Back to Top