BREAKING NEWS

सुचना तक्रारींची तात्काळ सोडवणुक करुन गोरगरीब लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळुन द्या

जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमती शांताबाई जवळगांवकर यांचे प्रतिपादन

BY   Posted On : 22 Apr 2017 203

निराधार, दारिद्र्य रेषेखालील गरजु लाभार्थी व शेतकरी वर्गासाठी जिल्हा परिषद व पंचायत समीतीत असलेल्या योजनाच्या माध्यमातुन नियमानुसार लाभ मिळाने गरजेचे आहे. यासाठी पंचायत समीतीच्या सर्व अधिकारी, कर्मचार्यांनी ग्रामीण भागातुन येणार्या सुचना तक्रारींचे तात्काळ निराकरण करुन तालुक्यातील जास्तीक जास्त खर्या गोरगरीब लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळुन द्यावा अशा सुचना श्रीमती शांताबाई जवळगांवकर यांनी केल्या.

त्या हिमायतनगर येथील पंचायत समीती कार्यालयात नवनिर्वाचीत सभापती सौ.मायाताई दिलीप राठोड यांच्या संकल्पनेतुन सामन्यांच्या अडचणींची व समस्या दुर करण्याच्या उद्देशाने दालनासमोर लेखी तक्रार पेटी लावण्यात आली. या तक्रार पेटीच्या शुभारंभ प्रसंगी उपस्थीतांशी चर्चा करतांना बोलत होत्या. पुढे बोलतांना त्या म्हणाल्या की, सभापतींचा हा उपक्रमस्तुत्य असुन, यामुळे जनतेचे प्रश्न लवकर मार्गी लागतील न भ्रष्ट अधिकारी व कर्मचार्यावर अंकुश लावणे सोपे होणार असल्याने जनतेने आपल्याला येणार्या आडचणी तक्रारी लेखी स्वरुपात दयाव्यात असे आवाहनही त्यांनी केले. याप्रसंगी पंचायत समीतीच्या माध्यमातुन राबवील्या जाणार्या घरकुल, ओटीएसपी, पाणी पुरवठा, रोजगार हमी योजना, 8 अ च्या नोंदी, रस्ते, नाली, पाणी टंचाई, शौच्चालय निर्मीत्तीतुन स्वच्छता अभियान, ग्रामस्तरावर राबवील्या जाणार्या योजना यासह सर्व सामान्य नागरीकासाठी असलेल्या कल्याणकारी योजनांचा आढावा घेत सवीस्तर चर्चा केली. यावेळी प्रस्तावीक करतांना सभापती सौ.माया दिलीप राठोड म्हणाल्या की, परिसरातील गावातील नागरीकांच्या अनेक प्रशासकीय तक्रारी नेहमीच होत असतात. प्रत्यक्षात अनेकजन तोंडी सांगत असल्याने त्याचे निराकरण करणे कठीण होते. किवा अनेकदा नागरीक आल्यानंतर आमची भेट होत नाही. त्यामुळे नागरीकांना लेखी तक्रारी देण्याची सवय जडावी आणी तक्रारी थेट आमच्या पर्यंन्त पोचाव्यात जेनेकरुन त्यांची दखल घेऊन तक्रारी /समस्या/ अडचणी/ सोडवीणे शक्य होतील. यासाठी 14 एप्रील डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचीत्य साधुन दालनासमोर सुचना - तक्रार पेटी लावण्यात आली आहे. नुकतीच पहीली मासीक बैठक संपन्न झाली असुन, बैठकीत सर्व ग्रामसेवक, कार्यालयीन अधिकारी व कर्मचार्यांना वेळेचे बंधन पाळण्याच्या सक्त सुचना करण्यात आल्या आहेत. त्यामुळे कार्यालईन कामकाजास गती मिळत असुन, दांडी बहाद्दरांना लगाम लागली यावेळी आवर्जुन सांगीतले. यावेळी गटविकास अधिकारी सुहाल कोरेगावे, नेहा जवळगांवकर, उपसभापती खोब्राजी वाळके, विकास पाटील, गजानन सुर्यवंशी, राजु पाटील, काशीनाथ गोसलवाड यांच्यासह अनेकांची उपस्थीत होते.

Tag:
Back to Top