BREAKING NEWS

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य दिशादर्शक व प्रेरणादायी - सौ.वर्षाताई भोसीकर

BY   Posted On : 22 Apr 2017 148

महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य भारतीय समाजासाठी सदैव दिशादर्शक व प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन माजी जि.प.सदस्या सौ.वर्षाताई भोसीकर यांनी केले.

भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 126 व्या जयंती निमित्त प्रियदर्शनी माध्यमिक कन्या शाळा कंधार येथे सकाळी 10 वाजता अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी त्या बोलत होत्या.प्रारंभी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालुन अभिवादन करण्यात आले.यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस संजय भोसीकर, हमीद्दोदिन मौलिसाब,मुख्याध्यापिका राजश्री शिंदे,हणमंत पेठकर,स्वच्छ महाराष्ट्र अभियान कमिटीचे सदस्य राजेश्वर कांबळे, ऍड. सिद्धार्थ वाघमारे,मुरलीधर थोटे,किशोर आंबेकर,सुधीर तपासे,अशोक कांबळे,चंद्रकांत सोनटक्के,सौ.शामा पाटील,सौ.मनीषा कुरुडे, आदींची प्रमुख उपस्थिती होती.

पुढे बोलतांना सौ.भोसीकर म्हणाल्या की,डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचे आयुष्य हाजारो वर्षाच्या सामाजिक,अन्यायग्रस्थ,शोषित गुलामगिरीत भरडलेल्या लोकांकरिता वेचले.त्याकाळात बहुजन समाजातील माणसांना अपेक्षित जीवन जगावे लागते होते.या गुलामगिरीतुन,अज्ञानातून व कनिष्ठ रूढी परंपरातुन समाजाला बाहेर काडण्यासाठी त्यांनी शिक्षणाचा प्रसार केला.हे करत असताना त्यांनी शिका,संघटित व्हा,संघर्ष करा असा मंत्र त्यांनी बहुजन समाजाला दिला.शिक्षणाने माणुस संस्कृत होतो,नवीन आव्हाने स्वीकारण्याचे सामर्थ्य प्राप्त होते.तसेच शिक्षण हे समाज परिवर्तनाचे व क्रांतीचे साधन आहे.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी जगातील सर्वात मोठी लिखित राज्यघटना दिली.त्यामुळे भारतामध्ये सामाजिक समतेची स्थापना होऊन सर्व जाती धर्मातील नागरिकांना सन्मानाने जगण्याचा अधिकार प्राप्त झाले असल्याचे त्या म्हणाल्या.यावेळी संजय भोसीकर यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर आंबेकर यांनी केले तर आभार प्रवीण जोगे यांनी मानले.

Tag:
Back to Top