BREAKING NEWS

तालुकाध्यक्षाच्या मानमानीला वैतागून ग्रामसेवक संघटनेच्या पदाधिका-यांचे सामुहिक राजीनामे

BY   Posted On : 22 Apr 2017 291

ग्रामसेवक संघटनेचे तालुकाध्यक्ष श्रीनिवास मुगावे हे पदाधिका-यांना विश्वासात तर घेतच नाहीत पण त्यांच्या हेकेखोर व मनमानी कारभाराला वैतागलेल्या काही ग्रामसेवकांची गोपनिय प्रकरणे दुस-याच्या माध्यमातून चव्हाट्यावर आणून ग्रामसेवकांना आडचणीत आणण्याचा उद्योग करीत असल्याने संतापलेल्या पदाधिका-यांनी सामुहीक राजीनामे ग्रामसेवक संघटनेच्या जिल्हाध्यक्षाकडे दिले आहेत या सामुहीक राजीनामा पत्राने संघटनेतील बेबनाव चव्हाट्यावर आला आहे.

ग्रामसेवक संघटनेच्या जिल्हाध्यक्षाच्या उपस्थितीत सहा महिन्यापूर्वी नायगाव तालुक्यातील ग्रामसेवकांची पंचायत समितीमध्ये बैठक होवून यात सर्वानुमते ग्रामसेवक संघटनेच्या नायगाव तालुकाध्यक्षपदी श्रीनिवास मुगावे यांची बिनविरोध निवड करण्यात आली होती. निवड निवडीनंतर मुगावे यांनी सर्वाना विश्वासात घेवून काम करण्याचे आश्वासन दिले होते. पण मागील दोन तीन महिन्यांपासून संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी सौजन्याने वागत नाहीत. तसेच विस्तार अधिका-यांना हाताशी धरून अनेक ग्रामसेवकांची पिळवणूक करीत असल्याचा आरोप ही संघटनेतील पदाधिकारी करीत आहेत त्याचबरोबर मुगावे यांना अध्यक्ष केल्यानंतर ग्रामसेकाकडून बरीच वर्गणी जमा करूण्यात आली होती व ती रक्कमही मुगावे यांच्याकडे ठेवण्यात आली पण त्या जमा रक्कमेचा हिशोब लागू देत नाहीत व कार्यकर्त्यांना हाताशी धरून काही ग्रामसेवकांच्या तक्रारी करण्यातही हातभार मुगावे यांनी लावला आहे. असे ग्रामसेवक सागंत आहेत या कारनाम्यामुळे संघटनेत मोठी फुट पडली असून तालुक्यातील ग्रामसेवकांनी मुगावे यांच्या विरुध्द संघटनेच्या पदाधिका-यांनीच दंड थोपटले आहे.

तालुका शाखेच्या पदाधिका-यांनी १४ एप्रिल रोजी एक पत्र ग्रामसेवक संघटनेच्या जिल्हाध्यक्षाला दिले असून त्यात मुगावे यांच्या मनमानी व हेकेखोर कारभाराला कंटाळून आम्ही संघटनेच्या पदाचे राजीनामे देत आहोत असे नमुद केले आहेत. या राजीनामा पत्रावर ता. सचिव टि.जी. रातोळीकर,कार्याध्यक्ष एस.जी.बोंडले, उपाध्यक्ष एस. व्ही. कौसल्ये, प्रल्हाद गोरे, आर.पी. नव्हारे, आर. एल. मदेवाड, एम.बी.शिंदे, नेरलेवाड, भागानगरे, केशव पवळे, कदम, शिंदे, अदी पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्ष-या आहेत. याबाबत ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष कदम यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की माझ्या कडे सदर राजीनामे आले आहेत याबाबत मी जिल्हा संघटनेतील सर्व पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगितले.

Tag:
Back to Top