BREAKING NEWS

महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 57 व्या वर्धापन दिनाची पूर्वतयारी बैठक संपन्न

BY   Posted On : 22 Apr 2017 62

महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 57 वा वर्धापन दिन सोमवार 1 मे 2017 रोजी असून त्यासाठीच्या मुख्य शासकीय ध्वजवंदन समारंभाची पूर्वतयारी बैठक प्रभारी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज त्यांच्या दालनात संपन्न झाली.

या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, उपविभागीय अधिकारी प्रदीप कुलकर्णी, मनपा अभियंता श्री. कदम, पोलीस उपअधीक्षक व्ही. पी. नांदेडकर, पोलीस निरीक्षक अरमान तडवी, तहसिलदार ज्योती पवार तसेच शिक्षण, क्रीडा, विद्युत विभाग, पोलीस प्रशासन आदी विभागाचे अधिकारी उपस्थित होते. मुख्य शासकीय ध्‍वजवंदन समारंभ सोमवार 1 मे 2017 रोजी सकाळी 8 वा. पोलीस मुख्‍यालय कवायत मैदान वजिराबाद येथे होणार आहे. या मुख्य शासकीय ध्वजवंदन समारंभास सर्व नागरिकांना उपस्थित रहाता यावे म्हणून सकाळी 7.15 ते 9 या कालावधीत ध्वजवंदनाचा किंवा इतर शासकीय अथवा अर्धशासकीय समारंभ करण्‍यात येऊ नये. जर एखाद्या कार्यालयास अथवा संस्‍थेला आपला स्‍वतःचा ध्‍वजवंदन समारंभ करावासा वाटल्‍यास त्‍यांनी तो समारंभ सकाळी 7.15 च्‍या पूर्वी किंवा सकाळी 9 च्‍या नंतर करावा, असेही यावेळी सूचित करण्यात आले.

यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी पोलीस मुख्‍यालय कवायत मैदान येथील सुविधा, ध्‍वजवंदन समारंभासाठीची सुरक्षा व्यवस्था, पोलीस बँण्ड, कवायत मैदानाची साफ-सफाई, बैठक व्यवस्था, शामियाना उभारणी, ध्वनीक्षेपण, वाहन व्‍यवस्‍था तसेच अनुषंगीक बाबींचा आढावा घेतला. सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे ध्‍वजवंदन चबुत-याची आणि खांबाची रंगरंगोटी, मुख्‍य शासकीय ध्‍वजवंदन कार्यक्रमाच्‍या मार्गावरील रस्‍त्‍यांची दुरुस्‍ती, डागडुजीचे कामे करुन घेण्‍याबाबत निर्देश देण्‍यात आले. या समारंभात शासन निर्णय, परिपत्रकानुसार प्रदान करावयाच्या पुरस्काराबाबत संबंधीतांची नावे रविवार 23 एप्रिल 2017 पुर्वी निवासी उपजिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करावीत, असे निर्देशीत करण्यात आले. प्‍लॉस्‍टीकच्‍या ध्‍वजावर निर्बंध असल्‍यामुळे शालेय विद्यार्थी, नागरीकांकडून प्‍लॉस्‍टीकच्‍या ध्‍वजाचा वापर होणार नाही. असे ध्‍वज इतरत्र रस्‍त्‍यावर दिसून येणार नाहीत याबाबत नागरीकांसह संबंधीत विभागांनी दक्षता घ्‍यावी अशी सूचना देण्यात आली. बैठकीस विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Tag:
Back to Top