BREAKING NEWS

घरफोडीत 70 हजारांचा ऐवज लंपास

BY   Posted On : 22 Apr 2017 61

घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी 70 हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना शिवनगर येथे घडली.

शिवनगर येथे शेख शमीम बेगम शेख इस्माईल(40) ह्या भाचीच्या घरी झोपण्यासाठी गेल्या होत्या. अज्ञात चोरट्यांनी संधीचा फायदा उचलून घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. कपाटातील चोन्या-चांदीचे दागिणे व नगदी असा एकूण 70 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. या प्रकरणी विमानतळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास फौजदार कडू करीत आहेत.

जिपच्या धडकेत मुलीचा मृत्यू
---------------
जिपच्या धडकेत मुलाचा मृत्यू झाल्याची घटना माळाकोळी परिसरातील लांडगेवाडी शिवारात रुपला तांडा फाटा येथे घडली. जिप क्रमांक 20एच.बी.5097 च्या चालकाने भरधाव वेगात चालवून मुलगी छकुलीहीस धडक दिली. या अपघातात तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी गुलाब पोमा राठोड यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन माळाकोळी पोलीस ठाण्यात जिप चालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास जमादार चव्हाण करीत आहेत.

Tag:
Back to Top