BREAKING NEWS

ग्रामपंचायत कर्मचारी युनियनचे विविध मागण्यासाठी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण

BY   Posted On : 22 Apr 2017 104

शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे सण २००७ पासूनच राहणीमान भत्ता देण्यात यावा यासह विविध मागण्यासाठी ग्रामपंचायत युनियनच्या ०८ कर्मचाऱ्यांनी हिमायतनगर तहसील कार्यालयासमोर सोमवारपासून आमरण उपोषण सुरु केले आहे.

हिमायतनगर तालुक्यातील ५२ ग्रामपंचायतीत कार्यरत असलेल्या पैकी केवळ ५ ग्रामपंचायती सोडल्या तर सर्वच ग्रामपंचायतीच्या संबंधितांनी येथे कार्यरत कर्मचाऱ्यांचा राहणीमान भत्ता, भविष्य निर्वाह निधी खाते काढणी व ८.३३ प्रमाणे रक्कम भरणे गरजेचे असताना याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. तसेच कर्मचाऱ्यांच्या सेवापुस्तिका भरून अद्यावयात करण्यातही कामचुकारपणा केला आहे. परिणामी राब- राब राबूनही हक्काचा भत्ता देण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ केली जात आहे. अनेकदा विनंत्या अर्ज करूनही भत्ता मिळत नसल्याने महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत युनियनचे मुख्य शाखा अर्धापूर यांच्या मार्गदर्शनाखाली दि.१७ पासून येथील तहसील व पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु केले. या उपोषणात १) भानुदास नागना पापुलवाड बोरगडी, २) देवराव नागोराव माने पवना, ३) किशोर खंडू कांबळे टेम्भूर्णी, ४) बलराम शिवराम आडे बळीराम तांडा, ५) अशोक श्यामराव शिरफ़ुले दिघी, ६) खंडेराव नानाराव कदम करंजी, ७) शिवाजी रुख्माजी देशमुखे वाशी, ८) साहेबराव परसराम राठोड वाई या आठ ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा समावेश असून, याला तालुक्यातही सर्व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा पाठिंबा आहे. सध्या उन्हाचा पारा ४४ अंश सेल्सियसवर गेला असताना उपोषण स्थळाला येथूनच कार्यालयात ये - जा करणारया एकही अधिकारी - कर्मचाऱ्यांनी साधी भेटही दिली नसल्याची खंत उपोषणकर्त्यानी बोलून दाखविली.

Tag:
Back to Top