BREAKING NEWS

जलनायक निवडीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

BY   Posted On : 22 Apr 2017 99

जिल्हास्तरीय जलसाक्षरता समिती नांदेडतर्फे जलनायकाची निवड करण्यासाठी इच्छूक व्यक्तींकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्जदार व्यक्तींनी त्यांचा वैयक्तीक तपशिल (Biodata), पासपोर्ट साईज फोटो, जलविषयक केलेल्या कामाची माहिती (छायाचित्रासह) घेतलेले प्रशिक्षण इत्यादी माहितीचा अर्ज बुधवार 19 एप्रिल 2017 ते सोमवार 24 एप्रिल 2017 रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत सदस्य सचिव तथा कार्यकारी अभियंता, नांदेड पाटबंधारे विभाग (उत्तर) जंगमवाडी, नांदेड यांचे कार्यालयात कार्यालयीन वेळेत सादर करावेत.

सोमवार 24 एप्रिल 2017 रोजी दुपारी 12 नंतर आलेल्या अर्जांचा विचार करण्यात येणार नाही याची संबंधितांनी नोंद घ्यावी, असे आवाहन सदस्य सचिव तथा कार्यकारी अभियंता नांदेड पाटबंधारे विभाग (उत्तर) जंगमवाडी नांदेड यांनी केले आहे. महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग मंत्रालय मुंबई शासन निर्णय क्र. वाल्मी-2016/ पृ.क्र.69/ 16/ लाक्षेवि (आस्था) दि. 30 नोव्हेंबर 2016 अन्वये जिल्हास्तरीय जलनायक निवडण्याचे ठरविण्यात आले आहे. जलनायक निवडीचे निकष पुढील प्रमाणे आहेत. जलविषयक अभियान स्वयंपूर्णरितीने चालविण्याचा अनुभव. आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय-राज्य स्तरावरील कामकाजाचा अनुभव. प्रभावीपणे विषय मांडणी व सामाजिक कार्यातील नेतृत्वाबाबत लोकमान्यता. प्राचीन जलसंस्कृती पासून आधुनिक जलसंस्कृतीची जाण. चांगले चारित्र्य. प्रशिक्षणाचा अनुभव आदी माहिती वेळेत सादर करावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.

Tag:
Back to Top