BREAKING NEWS

रास्तभाव धान्य दुकानात मे महिन्यासाठी साखर उपलब्ध

BY   Posted On : 22 Apr 2017 129

सार्वजनिक वितरण व्‍यवस्‍थेअंतर्गत नांदेड जिल्‍हयातील बीपीएल व अंत्‍योदय शिधपत्रिकाधारकासाठी शासनाने मे 2017 साठी नियमित नियतन साखर प्रति व्‍यक्‍ती 500 ग्रॅम प्रमाणे प्रौढ अथवा मूल / बालक असा भेदभाव न करता मंजूर केले आहे. मे 2017 या महिन्‍यात जिल्‍हयासाठी 4 हजार 575 क्विंटलचे नियतन शासनाकडून प्राप्‍त झाले असून पुढील प्रमाणे तालुका निहाय नियतन देण्‍यात आले आहे. या नियतनाची उचल करुन प्रत्‍यक्ष शिधापत्रिकाधारकास संबंधीत स्‍वस्‍त धान्‍य दुकानामार्फत वितरण करण्‍यात येणार आहे.

नांदेड व लोहा- 534 , हदगाव- 399, किनवट- 527, भोकर- 175, बिलोली- 287, देगलूर- 255, मुखेड- 487, कंधार- 374, लोहा- 323, अर्धापूर- 128, हिमायतनगर- 198, माहूर- 194, उमरी- 135, धर्माबाद-152, नायगाव- 263, मुदखेड- 144. याची सर्व बीपीएल, अंत्‍योदय शिधापत्रिकाधारकांनी स्‍वस्‍तधान्‍य दुकानातून साखरेची उचल करावी , असे आवाहन जिल्‍हाधिकारी नांदेड यांच्यावतीने जिल्हा पुरवठा अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

Tag:
Back to Top