BREAKING NEWS

हिमायतनगरच्या नवप्रशांत गणेश मंडळाला लोकमान्य गणेशोत्सवचे प्रथम पारितोषिक

BY   Posted On : 22 Apr 2017 181

नांदेड जिल्ह्यातील तालुकास्तरीय लोकमान्य सार्वजनिक गणेशोत्सवात सहभाग घेऊन लोकमान्य टिळकाचे विचार व त्या उपक्रमांतर्गत जनजागृती करून सामाजिक एकतेचा संदेश देणाऱ्या हिमायतनगर येथील नवप्रशांत गणेश मंडळाला महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने प्रथम क्रमांकाचे बक्षीस देऊन आज नांदेडमध्ये गौरविण्यात आले आहे.

लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांची 160 वी जयंती, तसेच त्यांनी सुरु केलेल्या सार्वजनीक गणेशोत्सवाच्या चळवळीला २०१६ ला १२५ वर्ष व "स्वराज्य हा माझा जन्मसिध्द हक्क आहे आणी तो मी मिळविणारच" या उदगाराचे शताब्दी वर्षानिमीत्ताने राज्यासह नांदेड जिल्ह्यात लोकमान्य सार्वजनिक गणेशोत्सव व लोकमान्य उत्सव असे विविध कार्यक्रम राबविण्यात आले होते. या माध्यमातुन लोकमान्य टिळकाचे विचार त्यांची चतु:सुञी तसेच अन्य उपक्रमाव्दारे जनजागृती घडवतील अशा सार्वजनीक गणेशोत्सव मंडळाच्या स्पर्धा जिल्हाधिकारी सुरेश काकांनी, पोलीस अधीक्षक संजय येनपुरे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत आयोजीत करण्यात आले होते. यावेळी गणेशोत्सव साजरा करण्याची मंडळाची पध्दत, देखावे, सामाजीक कार्य,समाजाचा सहभाग अदि विषयाबाबत मुल्यांकन करुन शासनाच्या वतीने तालुका, जिल्हा व विभागीय स्तरावर विजेते गणेश मंडळाचा गौरव व रोख बक्षिसे जाहीर करण्यात आले होते.

या स्पर्धेत हिमायतनगर तालुक्यातील बजरंग चौकातील नवप्रशांत गणेश मंडळाच्या युवकांनी सहभाग घेऊन लोकमान्य टिळकांना अभिप्रेत असलेल्या स्वदेशी, साक्षरता, बेटी बचाव, व्यसनमुक्ती, जलसंवर्धन या कल्पनेशी निगडीत देखावे सादर केले होते. दरम्यान सादर केलेल्या देखाव्याचे व विविध उपक्रम आणि विसर्जन आदींची पाहणी तालुका स्तरावरील निवड समितीचे तालुका गटशिक्षण अधिकारी यांचे अध्यक्षतेखाली सार्वजनीक गणेशोत्सव समितीच्या सदस्यांनी दि.08 ते 12 सप्टेबर 2016 या कालावधीत प्रत्यक्ष भेट देवुन विहित केलेल्या गुणांकन पध्दतीनुसार गुणांकन दिले. त्याचा निकाल व बक्षीस वितरण सोहळा दि.१८ रोजी नांदेड येथे पार पडला असून, हिमायनगरच्या नवप्रशांत गणेश मंडळाचे राम नरवाडे, संतोष नरवाडे, अमोल धुमाळे याना प्रथम क्रमांकाचे बक्षीस व रोख २५ हजार रुपयाचे पारितोषिक, वित्त व नियोजन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, शिक्षण, क्रीडा, सांस्कृतिक मंत्री विनोद तायडे, प्रधान सचिव वल्सा नायर सिंह, संजय पाटील यांच्या स्वाक्षरीनिशी असलेले प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले आहे. हिमायतनगर तालुक्यातील नवप्रशांत गणेश मंडळाला प्रथम क्रमांकाचे बक्षिस मिळाल्याबद्दल पोलीस निरीक्षक विठ्ठल चव्हाण, परमेश्वर मंदिर ट्रस्टचे उपाध्यक्ष महाविरचंद श्रीश्रीमाळ, लक्ष्मण शक्करगे, प्रभाकर मुधोळकर, विजय नरवाडे, संजय ठाकूर, संतोष गाजेवार, हनुसिंग ठाकूर, मारोती गुंडाळे, अनिल मादसवार, गजानन मुत्तलवार, अनिल पाटील यांच्यासह सर्व स्तरातील नागरीक व गणेशभक्त युअवकातून नवप्रशांत गणेश मंडळाचे कौतुक व अभिनंदन केले जात आहे.

Tag:
Back to Top