BREAKING NEWS

शेतक-यांकडे 'खत' खरेदीसाठी आधार कार्ड अनिवार्य – कृषी अधिकारी अनिल जोंधळे

BY   Posted On : 22 Apr 2017 134

शेतक-यांना खत खरेदी करताना कृषी सेवा केंद्रावर जाताना सोबत आधार कार्ड नेणे आवश्‍यक आहे. ई- पॉश मशिनवर अंगठा लावल्‍यानंतरच खत मिळणार आहे. तेव्‍हा शेतक-यांकडे खत खरेदी साठी आधारकार्ड असणे अति आवश्‍यक आहे. अन्‍यथा त्‍या शेतक-यांना खत खरेदी करता येणार नाही. म्‍हणुन आधारकार्ड अनिवार्य आहे. अशी माहिती पंचायत समितीचे कृषी अधिकारी अनिल जोंधळे यांनी दिली.

केंद्रसरकारने शेतक-यांसाठी डीबीटी थेट लाभांतर हस्‍तांतर प्रक्रिया सुरु केली आहे. पेरणी पूर्व व त्‍याकाळात खत खरेदी करताना आता आधार कार्डाची गरज आवश्‍यक आहे. तालुक्‍यातील सर्व शेतक-याकडे खता साठी यापुढे आधार कार्ड लागणार आहे. ज्‍याच्‍याकडे नसेल त्‍यांनी ते काढून घ्‍यावे. कृषी सेवा केंद्र दुकानात गेल्‍यानंतर आधार कार्ड द्यावे लागेल. ई पॉश ( पांईट टू द सेल ) वर अंगठा लावल्‍यानंतरच खत मिळणार आहे तेव्‍हा शेतकरी बांधवानी शेती संबंधित असले त्‍यांनी आधार कार्ड नसेल तर ते काढून घ्‍यावेत असे आवाहन पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रभाकर फांजेवाड पं.स. कृषी अधिकारी अनिल जोंधळे कृषी विभागाच्‍या विस्‍तार अधिकारी जयश्री भोसले यांनी केले आहे.

शिक्षक समायोजन प्रक्रिया
------------------
लोहा पंचायत समितित आज विद्यार्थ्री संख्ये अभावी सरप्लस झालेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील पाच शिक्षकांचे समायोजन सभापती सतीश पाटील उमरेकर, बीडिओ प्रभाकर फ़ांजेवाड, प्रभारी गटशिक्षणाधिकारी बी पी गुट्टे, शिक्षण विस्तार अधिकारी सोनटक्के ,सौ आंबडवाड यासह श्री शिंदे, दिनेश तेलंग व शिक्षण विभागातील कर्मचारी उपस्थित होते.

Tag:
Back to Top