BREAKING NEWS

भगवान दत्तप्रभु मुर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशोहण, अखंड दत्तनाम सप्ताह सोहळ्याचे आयोजन

अखंड दत्तनाम सप्ताह सोहळ्याचे आयोजन

BY   Posted On : 22 Apr 2017 69

भगवान दत्तप्रभु मुर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण व अखंड दत्तनाम सप्ताह सोहळ्याचे आयोजन श्री संत प.पु.दिगांबर गिरी, गुरु महाराज मठ संस्थान तारतिर्थ जुना पुल वाजेगांव येथे करण्यात आले असून दि.21 रोजी दत्त मुर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण व दुपारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

अखंड दत्तनाम सप्ताह दि.15 एप्रिल पासून सुरु करण्यात आला असून या सप्ताहामध्ये गुरु गंभीरबन महाराज कोलंबे यांच्याहस्ते मुर्ती स्थापना तर संत आनंदमन महाराज, संत बाळगिर महाराज(रावसाहेब महाराज), संत समगिरी महाराज, बाळगिर महाराज, संत रुद्रागिर महाराज, संत समभुगिरी महाराज, संत दामुनाथ महाराज, संतराम महाराज, माधव महाराज व संत बालयोगी महाराज, देवपुरी महाराज यांची प्रामुख्याने उपस्थिती राहणार असून या कार्यक्रमास माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, दक्षिणचे आमदार हेमंत पाटील, आ.डी.पी.सावंत, आ.अमरनाथ राजुरकर, जि.प.अध्यक्षा श्रीमती शांताबाई जवळगांवकर, पं.स.कंधारचे सभापती सत्यभामा देवकांबळे, जि.प.सदस्य मनोहर शिंदे, डॉ.आर.एस. सावरगांवकर, वाजेगांवचे सरपंच जलील साहेब, वाजेगांवचे पोलीस पाटील बालाजी पाटील, जगन्नाथ अंकमवार, विठ्ठलराव टापरे व बळीरामपूरचे सरपंच अमोल गोडबोले हे उपस्थित राहणार असून या सप्त्याहामध्ये पंचक्रोशीतील ग्रामीण भागातील भजनी मंडळींचाही सहभाग राहणार असून शुक्रवारी तारतिर्थ जुना पुल वाजेगांव येथे समाधी पुजा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमास जास्तीत जास्त भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जगन्नाथ महादू सुर्यवंशी पुजारी व भक्त-शिष्य मंडळ यांचे तर्फे करण्यात आले आहे.

Tag:
Back to Top