BREAKING NEWS

युवक काँग्रेस बळीरामपूरचा मोफत आयुर्वेदिक शिबीर हा स्तुत उपक्रम - नरेंद्र चव्हाण

BY   Posted On : 22 Apr 2017 119

युवक काँग्रेस बळीरामपूर सर्कलच्या वतीने विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त बळीरामपूर येथे मोफत आयुर्वेदिक शिबीर घेवून अनेक रुग्णांवर उपचाराची संधी दिल्याबद्दल आयोजकासह पदाधिका-यांचे त्यांनी ऋण व्यक्त करत हा स्तुत उपक्रम राबविल्याबद्दल नरेंद्र चव्हाण यांनी अभिनंदन केले.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून आयुर्वेदिक पध्दतीने आम्लपित्त, मुळव्याध, भगंदर, मुतखडा, मान-पाठ-कंबरदुखी, सांधेवात, आमवात, गुडघेदुखी व इतर आजाराचे निदान करण्यात आले. यावेळी सहभागी होणा-या रुग्णांना वरील सर्व आजारांचे मोफत औषधेही देण्यात आले. याच शिबीरात 0 ते 12 वयोगटापर्यंतच्या बालकांसाठी मोफत सुवर्ण प्राशन जवळपास 400 बालकांना दिले. या शिबीराच्या उद्घाटन प्रसंगी नरेंद्र चव्हाण यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात आयुर्वेदिक पध्दतीने उपचार शिबीर राबविल्याबद्दल युवक काँग्रेसच्या पदाधिका-यांचे अभिनंदन केले.

अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदचे सदस्य गंगाप्रसाद काकडे, पंचायत समितीचे सदस्य गंगाधर नरवाडे, माजी पं.स.सदस्य सुनिल पवार, खाजाशेट्ट बाडीवाले, पत्रकार संघाचे अध्यक्ष रमेश ठाकूर, चिमणाजी पाटील यांच्यासह मान्यवर पदाधिका-यांची उपस्थिती होती. यावेळी माजी सरपंच मुन्ना पांचाळ यांनी शिबीराचे सुत्रसंचालन तर स्वागताध्यक्ष किशन गव्हाणे यांनी उपस्थित पाहूण्यांचे स्वागत केले. आयुर्वेदिक उपचारसंबंधी डॉ.शेख इरशाद यांनी महत्व सांगितले. या शिबीरात आयुर्वेदिक तज्ञ डॉ.अमोल हिंगमिरे, डॉ.शेख इरशाद, डॉ.गिरीष सुर्यवंशी, डॉ.राम नागरे, डॉ.पाशा शेख यांनी शेकडो रुग्णांची तपासणी केली. या कार्यक्रमाचे आयोजन युवक काँग्रेसचे दक्षिण विधानसभा सरचिटणिस कपिल सोनकांबळे व संयोजक गंगाधर जोंधळे, विकास कंधारे, बलमा मस्के, धनराज गव्हाणे, संदिप सोनसळे, मंगेश कदम, धम्मदिप सावंत, मंगेश कदम, विकास खंदारे, किरन पंडीत, प्रविण पंडीत, मंगेश पंडीत यांच्यासह युवक काँग्रेसच्या पदाधिका-यांनी हे शिबीर यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले.

Tag:
Back to Top