BREAKING NEWS

पीएच.डी. कोर्सवर्कसाठी संशोधन केंद्रावर नोंदणी सुरु

BY   Posted On : 22 Apr 2017 344

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या आर.ए.सी.च्या बैठकांमध्ये पीएच.डी.च्या ज्या संशोधक विद्यार्थ्यांना मार्गदर्शक उपलब्ध करून दिलेले आहेत. मात्र अशा विद्यार्थ्यांना अद्याप पात्रता क्रमांक प्राप्त केलेला नसल्यामुळे किंवा अन्य कारणामुळे त्यांना विद्यापीठाकडून मान्यतेचे पत्र मिळाले नाही, अशा संशोधक विद्यार्थ्यांना उन्हाळी २०१७मध्ये संबंधीत संशोधन केंद्रावर होणारे कोर्सवर्क पूर्ण करता येईल. यासाठी संशोधक विद्यार्थ्यांना संशोधन केंद्रावर दि.२९ एप्रिल पर्यंत नोंदणी करता येईल.

संशोधक विद्यार्थ्यांना विद्यापीठाने मार्गदर्शक उपलब्ध करून दिलेले प्रमाणपत्र आहे. अशा विद्यार्थ्यांनी नियमानुसार शुल्क भरून संबंधीत संशोधन केंद्रावर होणाऱ्या पीएच.डी. कोर्सवर्कच्या तासिकांना बसता येईल. त्याच प्रमाणे ज्या विद्यार्थ्यांना नोंदणीपत्र मिळालेले आहे. मात्र त्यांनी पीएच.डी. कोर्सवर्कसाठी प्रवेश घेतला नाही असे संशोधक विद्यार्थी सदर कोर्सवर्कसाठी प्रवेश घेऊ शकतात. सर्व संशोधन केंद्रांनी अशा विद्यार्थ्यांना पीएच.डी. कोर्सवर्क पूर्ण करण्याची परवानगी द्यावी व नियोजित वेळी त्यांचे परीक्षा आवेदन पत्र विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडे पाठवावेत, असे विद्यापीठाच्या पदव्युत्तर विभागाचे उपकुलसचिव यांनी परिपत्रकाद्वारे कळविले आहे.

स्वारातीम विद्यापीठात सेट/नेट/गेट परीक्षेवर राष्ट्रीय कार्यशाळा
----------------------
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील गणितीयशास्त्रे संकुलामध्ये दि.०५ ते १२ मे, २०१७ या दरम्यान आठ दिवशीय सेट/नेट/गेट परीक्षेवर राष्ट्रीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.

जून, २०१७मध्ये होणारी सीएसआयआर- नेट परीक्षा तसेच नोव्हेंबर, २०१७मध्ये होणाऱ्या सेट परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना फायदा व्हावा, या उद्देशाने विविध विद्यापीठातील तज्ज्ञ प्राध्यापकांना मार्गदर्शनासाठी या कार्यशाळेत बोलविण्यात आले आहे. कार्यशाळेची सर्व माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी गणेश फड (९०९६०४४५०९) आणि डॉ. सुरेंद्रनाथ रेड्डी (९०९६०७७७८९) यांच्याशी संपर्क साधावा तसेच गणित व संख्याशास्त्र विषयातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा, असे आवाहन गणितीयशास्त्रे संकुलाचे संचालक डॉ. ज्ञानेश्वर पवार यांनी केले आहे.

Tag:
Back to Top