BREAKING NEWS

वन विभागाच्या दुर्लक्षामुळे अवैध वृक्षतोड वाढली

BY   Posted On : 22 Apr 2017 104

वन विभागाचे अधिकारी अवैध वृक्षतोड करणा-या टोळीशी संगणमत करीत मुक परवानगी दिल्याने. नायगाव तालक्यात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड सुरू आहे. बेफाम वृक्षतोड होत असल्याने पर्यावरणाच संतुलन बिघडत चालले असून. पर्यावरणाचा ह्रास करणा-या वन विभागाच्या अधिका-यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

शासनाने एकीकडे झाडे लावा झाडे जगवा यासाठी लाखोंचा निधी खर्च करीत आहे. मात्र दुसरीकडे वन विभागाच्या अधिका-यांचे अवैध वृक्ष तोड करणा-या टोळीशी अर्थिक हितसंबंध मोठ्या प्रमाणात वाढल्याने अधिकारी या बाबीकडे कानाडोळा करीत आहेत. अधिका-यांच्या अर्शीवादाने मुजोर बनलेल्या अवैध वृक्षतोड करणारी टोळीने नायगाव तालुक्यात धुमाकूळ घातला आहे. कांडाळा, मुगाव, कुंचेल, धानोरा, गडगा, शेळगाव गौरी, रामतीर्थ, टाकळी. कामरसपल्ली. जिगळा. बिजूर. टाकळी. आळंदी, केरूर, अंजणी, हिप्परगा माळ, चिटमोगरा, बोरगाव, अटकळी, डोणगाव, आदमपूर, आदि सह अन्य गावात मोठ्या प्रमाणात अवैधरीत्या खुलेआम चिंच,आंबा, लिंब, बाभूळ, शिव बाभूळ आदिसह अन्य वृक्षाची मोठ्या प्रमाणात कत्तल करीत असल्याने पर्यावरणाचा -हास होत आहे. नायगाव व नरसी चौकातून विविध वाहनांने तोडलेली लाकडे भरून आधिका-या समोरूनच जात असताना ही काहीही कार्यवाही करण्यात येत नाही. कुठलीच कारवाई होत नसल्याने या भागात वृक्षतोड करणाऱ्या टोळीचे राज्य निर्माण झाले आहे.

शासन झाडे लावून झाडांचे संगोपण करण्यासाठी जोरदार प्रयत्न करीत असतांना वन विभागातील अधिकारी आपले अर्थिक हितसंबध जोपासण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यावरणाचा ह्रास करीत असून. या गंभीर बाबीकडे लक्ष घालून होणारी बेसुमार वृक्षतोड थांबवावी अशी मागणी होत आहे. सदरच्या अवैध वृक्षतोड होत असल्याबद्दल नायगाव तालुक्याचे वनपाल असलेले ढगे यांच्याशी संपर्क साधून विचारणा करण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी काहीही प्रतिसाद दिला नाही. नायगाव तालुक्यातून तोडलेली झाडे कुष्णूर येथील एका कंपणीला पुरविण्यात येतात. सदरची कंपणी दगडी कोळसा किंवा बायोकोलचा वापर करण्याऐवजी कमी किमतीत तोडण्यात आलेल्या वृक्षांची लाकडे जळतन म्हणून मिळतअसल्याने लाकडांचाच वापर करीत आहे.

Tag:
Back to Top