BREAKING NEWS

पोलीस अधीक्षकांनी केला आपल्या सर्वोत्कृष्ट नेमबाजाचा सन्मान

BY   Posted On : 22 Apr 2017 147

महाराष्ट्र पोलीस नेमबाजी स्पर्धेत दोन सुवर्ण,एक रजत आणि दोन कास्य पदकासह सर्वसामान्य विजेता चषक पटकावणाऱ्या पोलीस कर्मचारी शंकर भारतीचा काल झालेल्या मासिक गुन्हे परिषदेत सन्मान करण्यात आला.

17 वि महाराष्ट्र पोलीस नेमबाजी स्पर्धा 27 फेब्रुवारी 2017 ते 2 मार्च 2017 दरम्यान दौंड जिल्हा पुणे येथे पार पडली.त्यात नांदेडच्या काही पोलीस कर्मचाऱ्यांनी भाग घेतला होता.त्यात एक शंकर बालाजी भारती (ब.न.3191) हे होते.या नेमबाजी स्पर्धेत शंकर भरती यांनी विविध प्रकारच्या नेमबाजी स्पर्धात दोन सुवर्ण,एक रजत आणि दोन कास्य पदकांची कमाई केली.सोबतच सर्वसाधारण विजेते पदासाठी फिरता चषक पटकावला. काल झालेल्या मासिक गुन्हे परिषदेत शंकर भारती यांना नांदेडचे पोलीस अधीक्षक संजय येनपुरे यांनी प्रशस्तीपत्र आणि दोन हजार रुपये रॉक रक्कम देऊन सन्मान केला.भविष्यात आणखीन उज्ज्वल कामगिरी करण्याच्या सूचना दिल्या.तसेच भविष्यातील नेमबाजी स्पर्धेच्या तयारीसाठी आवश्यक मदत करण्याचे आश्वासन दिले. या प्रसंगी अपर पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ,सर्व पोलीस उप अधीक्षक,स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक, सर्व ठाणे प्रभारी अधिकारी यांनीही शंकर भारती यांना शुभकामना दिल्या.

Tag:
Back to Top