BREAKING NEWS

शॉर्टसर्किटमुळे पानपट्टे यांच्या इलेट्रॉनिक्स दुकानास आग... लाखोंचे नुकसान

BY   Posted On : 22 Apr 2017 640

हिमायतनगर शहरातील बस स्थानक परिसरात असलेल्या एका इलेक्ट्रॉनिक्स दुकानाला शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची घटना सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास घडली आहे. या घटनेत विजेवर चालणारी अनेक उपकरणे जळून खाक झाल्याने लाखोंचे नुकसान झाले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि हिमायतनगर परमेश्वर मंदिर कॉम्प्लेक्स मधील तळमजल्यात असलेल्या राजेश इलेक्ट्रॉनिक्स व इंटरप्रायजेस या दुकानाचे मालक राजेश पानपट्टे हे नित्याप्रमाणे दुकान बंद करून घरी गेले होते. सकाळी अचानक ७.३० वाजेच्या सुमारास विजेचा दाम कमी - अधिक झाल्यामुळे काउंटरजवळील बोर्डात शॉर्टसर्किटहोउं आगीने पेट घेतला. शटरमधुन धुराचे लोट बाहेर येत असल्याने बघ्याची एकच गर्दी झाली होती. अनेकांनी शटर काढून आग विझविण्याचा प्रयत्न केला. दरम्यान आगीच्या या घटनेत विक्रीसाठी असलेल्या सॅमसंग कंपनीच्या एलईडी टीव्ही, फ्रिज, कुलर, टीव्ही आदींसह अन्य विजेवर चालणारी उपकरणे आगीमुळे जाळून राख झाली. तर काही वस्तू आगीच्या लोटामुळे निकामी झाल्या. तसेच काउंटर, कागदपत्रे यासह अन्य साहित्य जळून राख होऊन अंदाजित २ ते ३ लाखाचे नुकसान झाले असल्याचे श्री पानपट्टे यांनी नांदेड न्यूज लाईव्हशी बोलताना सांगितले. घटनेची माहिती पोलीस, महावितरण, तलाठी यांच्यासह संबंधितांना देण्यात आली असून, वृत्त लिहीपर्यंत बैंक अधिकार्याशिवाय अन्य कोणत्याही खात्याच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी भेट दिली नव्हती. अचानक शॉर्टसर्किटमुळे झालेली दुर्घटनेचा पंचनामा करून महावितरणाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणीही दुकानदाराने केली आहे.

वीज ग्राहकांना महावितरणचा झटका
------------------------
गेल्या काही महिन्यापासून महावितरण कंपनीच्या ठेकेदाराकडून वापरात आलेल्या वीज रिडींग घेऊन देण्यात दिली जाणारी देयके हि मनमानी पद्धतीने दिली जात आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक मेटाकुटीला आला असून, अव्वाच्या सव्वा बिल्यामुळे अडचणीत आला आहे.

या महिन्यात तर महावितरणच्या वतीने ग्राहकांना चांगलाच झटका बसला असून वीज देयके भरण्याची अंतिम तारीख १५ असताना वीज आकार देयकाचे वितरणसुद्धा तारखेच्या दिवशी तर काही ग्राहकांना चक्क तारीख गेल्यानंतर देण्यात आली आहेत. याचा नाहक फटका वीज ग्राहकांना सहन करावा लागत असून, देयके भरण्याची तारीख गेल्यानांतर वीज बिल हातात पडल्याने विलंब शुल्क भरण्याची वेळ आली आहे. यामुळे अनेक ग्राहकांना १० ते ५० रुपयांपर्यंतची अधिकची रक्कम भरावी लागणार असल्याने वीज ग्राहकातून संबंधित ठेकेदार व महावितरणच्या गलथान कारभाराबाबत संताप व्यक्त होत आहे. तसेच अनेक ग्राहकांची मीटर बिघडलेली असताना त्यांना जवळपास ८ ते ९ महिन्यापासून मीटर दिल्या गेले नाही. त्यामुळे फॉल्टी बिलाच्या नावाने अव्वाच्या सव्वा पद्दाथीने अंदाजित देयके देऊन संबंधित गुतेदाराकडून ग्राहकांची पिळवणूक केली जात असल्याचे अनेक ग्राहक बोलून दाखवीत आहेत.

Tag:
Back to Top