BREAKING NEWS

विवेकानंद प्रा. शाळेच्या मुख्याध्यापिका निर्मला कुलकर्णी सेवानिवृत्त

BY   Posted On : 22 Apr 2017 49

येथील ज्ञानदिप शिक्षण मंडळ संचलित विवेकानंद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती निर्मला कुलकर्णी या नियत वयोमानानुसार 27 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त झाल्या. त्यांना संस्थेच्यावतीने एका कार्यक्रमात भावपूर्ण निरोप देण्यात आला.

श्रीमती निर्मला कुलकर्णी यांनी गेल्या 25 वर्षापेक्षा अधिक काळ मुख्याध्यापकपदाची धुरा समर्थपणे सांभाळली. सहशिक्षक म्हणून त्यांनी या शाळेत सेवेला प्रारंभ केला. अल्पावधीतच आपल्या कार्याची चुणूक दाखवत मुख्याध्यापकपदी बढती मिळवली. आपल्या प्रदीर्घ सेवेदरम्यान आलेल्या अडचणींवर संस्थेचे पदाधिकारी व सहकार्‍यांमुळे मात करता आली, असे मत निरोप समारंभात व्यक्त केले. संस्थेचे पदाधिकारी व सहकार्‍यांनी केलेल्या सहकार्याबद्दल श्रीमती निर्मला कुलकर्णी यांनी मनोगतातून कृतज्ञता व्यक्त केली.
संस्थेचे सचिव उत्तम टिकोरे, कोषाध्यक्ष पंडीतराव देशमुख, पी.व्ही. सूर्यवंशी, केंद्रप्रमुख प्रकाश जाधव, अ‍ॅड.मुरलीधरराव ढाके, प्रा.गाढे, लासुरे, ए.जी. सोनवणे, डी.के. झाडे यांची गौरवपर भाषणे झाली. त्यानंतर संस्थेच्यावतीने श्रीमती कुलकर्णी यांना शाल, श्रीफळ व स्वामी विवेकानंदांची प्रतिमा व भेट वस्तू देऊन निरोप देण्यात आला. तसेच श्रीमती कुलकर्णी यांच्या कुटुबांतील सदस्यांचाही गौरव करण्यात आला. कार्यक्रमाला प्राचार्य अशोक टिकोरे, गटशिक्षणाधिकारी प्रमोद सूर्यवंशी, द्वारकाबाई कुलकर्णी (नानी), सचिन पांडे, पत्रकार अतुल पांडे, एस.जी.लोखंडे यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी व शिक्षक, कुलकर्णी यांचे कुटुंबिय, आप्त व स्नेही उपस्थित होते.

Tag:
Back to Top