BREAKING NEWS

विवाहितेचा जाळून खून

BY   Posted On : 22 Apr 2017 89

नांदेड(प्रतिनिधी)एका विवाहितेेचा लग्नानंतर एका वर्षातच खून केल्याचा प्रकार बिहारीपूर ता.मुखेड येथे घडला आहे.

एक 20 वर्षीय विवाहिता शेख अंजूम उर्फ मुज्जू अताऊर रहेमान हिने मृत्यूपूर्व जबाब दिला आहे की,2 एप्रिल रोजी निलोफर,हनीमाबी,सासरा आणि दीर यांनी मिळून तिला अंगावर रॉकेल टाकून पेटून दिले.अंजूमचे लग्न एक वर्षापूर्वी झाले होते.तेव्हापासून तिला त्रास दिला जात होता.3 एप्रिल रोजी मध्यरात्री 1 वाजता ती शासकीय रूग्णालय नांदेड येथे मरण पावली.तिच्या मृत्यूपूर्व जबाबावरून पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल केला असून मुक्रमाबादचे पोलिस उपनिरीक्षक तुंकलवाड करीत आहेत.

Tag:
Back to Top