पुसद अर्बन बँकेचा जल वितरणाचा सामाजिक उपक्रम

पुसद(प्रतिनिधी)आपल्या पुसद अर्बन बँकेच्या सामाजिक उपक्रमांतर्गत बँकेने पुसद शहरातील 11 पाणी टंचाईग्रस्त भागात 5000लिटर व 2500 लिटर पाण्याच्या टाक्या लावल्या त्यामध्ये नविन पुसद -1,महावीर नगर-1, तुकाराम बापू वार्ड -2, नावलबाबा वार्ड-1,शिवाजी वार्ड-1,न्यायालयाचा मागचा परिसर-1,हनुमान वार्ड-1,देवी वार्ड-1,इटावा वार्ड-2 व अजून येत्या 2/3 दिवसात 5 टाक्या विविध भागात लावण्यात येणार आहे. या सर्व टाक्यांमध्ये दिवसातून दोनदा जवळपास एक लाख लिटर पाणी शहरातील टंचाईग्रस्त भागात टँकर द्वारे श्री यशवंतराव चौधरी यांच्या विहरीतून पुरविण्यात येत आहे.1 मे रोजी विविध भागात टाक्यांच्या लोकार्पण सोहळा मान्यवरांच्या हस्ते पार पडला.

Related Photos