Breaking news

माजी मुख्यमंत्री (स्व.)यशवंतराव चव्हाण यांना मुख्यमंत्र्यांकडून अभिवादन

नागपूर(प्रतिनिधी)महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री व भारताचे माजी उपपंतप्रधान दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या 71 व्या पुण्यतिथीनिमित्त विधानभवन येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली.

यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, भंडारा-गोंदिया स्थानिक प्राधिकारी संघातून विधान परिषदेवर निवडून आलेले परिणय फुके, विभागीय आयुक्त अनूप कुमार, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, विधिमंडळ सचिवालयाचे अवर सचिव उमेश शिंदे, सुभाष नलावडे, सुनील झोरे तसेच नितीन आहेर, मधुकर भेंडेकर आदी अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री चंद्रशेख्रर बावनकुळे, परिणय फुके, विभागीय आयुक्त अनूप कुमार, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस गुलाब पुष्प वाहून अभिवादन केले. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता बळवंत रामटेके, सहाय्यक अभियंता अविनाश गुल्हाने, विजय काळे, अजय साखरकर, रोशन भेंडे आदी उपस्थित होते.

रामगिरी येथे यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन
------------------------
रामगिरी या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री व भारताचे माजी उपपंतप्रधान दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली.

संविधान प्रास्ताविकेचे वाचन
-----------------------
रामगिरी या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज संविधान दिनाचे औचित्य साधून संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन केले . यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, भंडारा-गोंदिया स्थानिक प्राधिकारी संघातून विधान परिषदेवर निवडून आलेले परिणय फुके, विभागीय आयुक्त अनूप कुमार, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, माहिती संचालक राधाकृष्ण मुळी, जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर, उप जिल्हाधिकारी श्री. पांडे, प्रकाश पाटील आदी वरिष्ठ अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

Related Photos