Saturday, January 28, 2023
Home Uncategorized आत्महत्या केलेल्या विद्यार्थीनीवर अखेर अत्यसंस्कार; पोलिसांचा कसून तपास सुरू-NNL

आत्महत्या केलेल्या विद्यार्थीनीवर अखेर अत्यसंस्कार; पोलिसांचा कसून तपास सुरू-NNL

by nandednewslive
0 comment

हदगाव, शे. चांदपाशा। तालुक्यातील मनाठा सर्कल मधील केदारगुडा येथील निवासी शासकीय आदिवासी आश्रमशाळेत चौथ्या वर्गात असलेल्या मुलीने सोमवारी आत्महत्या केल्याची घटना घडली.

हा सदर दृदवी घटना संशयस्पद दिसत असल्याने मंगळवारी रात्री मयत मुलीच्या नातेवाइकांनी शाळा प्रशासना- वर लगेच गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी पोलिस स्टेशन मनाठाच्या समोर ठिय्या मांडला होता. याचबरोबर मागणी मान्य होईपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही अशी भूमिका घेतली. यामुळे प्रशासनासमोर प्रश्न निर्माण होता. या परिस्थितीचे गार्भिय लक्षात येताच पोलिसांनी प्रेत मनाठा मार्ग न आणता अन्य मार्गाने मयत विद्यार्थीनीच्या गावी नेले. आई-वडिलांना समजावून रात्री ९ वाजता मुलीचे अंत्यसंस्कार पार पाडले.

आत्महत्याचे ‘गुढ’कायम …
विश्रांती बाळू देशमुखे (वय १०) हिने सोमवारी (दि. १२) आत्महत्या केली. या प्रक्रणाचे ‘गुढ ‘ कायम असले तरी, मुलीच्या नातेवाइकांनी शाळा प्रशासानावर दुर्लक्ष केल्याचा आरोप मुख्याध्यापक आणि वसतिगृहाच्या कंत्राटी महिला अधीक्षक या दोघांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली.

शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर जो कोणी दोषी आढळेल त्याच्यावर गुन्हा दाखल केला जाईल. कोणासही सोडणार नाही, असे आश्वासन भोकर विभागाच्या पोलिस उपविभागीय अधिकारी शफकत अमना यांनी दिले. तसेच सामाजिक न्याय विभागाकडून आर्थिक मदत करण्याची शिफारस केल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, दिवसभरात त्यांनी अत्यंत बारकाईनं तपास करीत विद्यार्थीनीने आत्महत्या केलेल्या रुमची पाहणी केली ठसेतज्ञद्वरे फिगर प्रिंट पण घेण्यात आल्याची माहीती मिळाली.

संबंधित बातम्या वाचा

Leave a Comment

nandednewslive.com या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेत स्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Visitor counter NNL

Copyright @ 2011-2023 Online Social News Live Channel All Right Reserved -Developed & Designed by M&D Infotech Latur, Call – 86687 76434 

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
error: Content is protected !!