
अर्धापूर| अर्धापूर – हिमायतनगर राष्ट्रीय महामार्ग क्र. 752 वर लोणी खुर्द येथे लोणारी नदी आणि लेंडी नाला या दोन्हीही पुलाच्या मधील जो मेन रोड आहे त्याची खूपच उंची वाढत चालली आहे. गावातील नागरिकांच्या प्रवसाच्या दळणवळणकरता वाहनांना खुप अडचण येत आहे. म्हणून या झालेल्या, लोणारी नदीपुल व लेंढी नालापुलाची उंची कमी करुन गावात लोकांना दळणवळणासाठी रोडची उंची 3 मीटर पूर्वीप्रमाणे कमी करावी. किंवा दोन्हीही पुलाच्या मध्ये गावाच्या बाजुने सर्व्हिस रोड व थांबा (बसस्टँड) करावा.

याबाबत सुरुवातीला आपल्या भागाचे विद्यमान आमदार मा.मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेब तसेच सार्वजनिक बांधकाम हयवे कार्यकारी अभियंता आणि तालुक्याचे तहसीलदार साहेब आणि तालुक्याचे पोलीस निरीक्षक अशोक जाधव साहेब ह्यांना आज लोणी खुर्द ग्रामपंचायतने आमच्या मागण्या पूर्ण कराव्या.

असे निवेदन पत्रक त्यांना प्रत्यक्ष भेटून दिले आहे आणि अगोदर सर्व्हिस रोड झाल्याशिवाय पुढील काम होऊ देणार नाही. असे लोणी खुर्द ग्रामपंचायतच्या ग्रामसभेने आज ठराव केलेले हे निवेदन अश्या प्रकारे शासनास दिले आहे. ह्यावेळी लोणी खुर्द ग्रामपंचायतचे सरपंच प्रतिनिधी संजयराव लोणे (संचालक), कृ. ऊ. बा.नांदेड) उपसरपंच प्रतींनीधी विजय लोणे, तंटामुक्ती उपाध्यक्ष दीपक लोणे ,कामगार संघटना अध्यक्ष कोंडीबा लोणे ,सोबत सामजिक कार्यकर्ते राजेश लोणे, सुदास लोणे, किशोर लोणे, शिवाजी धोतरकर, शंकर सोळंके आदी सर्व मंडळी उपस्थित होती.

