नविन नांदेड। नांदेड तालुक्यातील बळीरामपुर ग्रामपंचायत निवडणुकीसाठी थेट जनतेतुन संरपच पदासाठी ७ तर१७ ग्रामपंचायत सदस्ययासाठी साठी ८५ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले असून आज १८ डिसेंबर रोजी १२ मतदान केंद्रावर मतदान होणार असल्याचे निवडणूक अधिकारी गजानन नांदेडकर यांनी दिली आहे.
निवडणुकीसाठी १२ मतदान केंद्रावर मतदान होणार आहे.सदरील निवडणूक प्रक्रिया नांदेड तहसीलदार किरण अंबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक अधिकारी म्हणून मंडळ अधिकारी गजानन नांदेडकर व साहयक म्हणून विजय रणविरकर,रामेश्वर भिंगोरे,रायटेक व कर्मचारी हे काम पाहाणार आहेत.
बाराही मतदान केंद्रावर साफ सफाई सह मतदान कर्मचारी साठी सुसज्ज व्यवस्था करण्यात आली असून कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आल्याचे निवडणूक अधिकारी गजानन नांदेडकर यांनी सांगितले आहे.
ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत चार गावात निवडणूक..
ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत बळीरामपुर , सिध्दनाथ, पांगरी, मार्कंड येथे ग्रामपंचायत निवडणूक होत असुन बळीरामपुर येथे १२ मतदान केंद्रावर तर सिध्दनाथ ३, पांगरी ३ ,मार्कंड ३ मतदान केंद्रावर १८ डिसेंबर रोजी निवडणूकी साठी मतदान होणार असून ग्रामीण पोलीस स्टेशन चे पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्या मार्गदर्शनाखाली चारही गावात व बुथनिहाय पोलीस कर्मचारी यांच्या कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आल्याची माहिती गोपनीय शाखेचे पोलिस अंमलदार दंतापले व पोलीस अंमलदार बिराजदार यांनी दिली.