Monday, June 5, 2023
Home किनवट दिव्यांग संघटित संघर्षासाठी प्रत्येक गावात शाखा स्थापन करणार – चंपतराव डाकोरे पाटिल -NNL

दिव्यांग संघटित संघर्षासाठी प्रत्येक गावात शाखा स्थापन करणार – चंपतराव डाकोरे पाटिल -NNL

by nandednewslive
0 comment

किनवट। दिव्यांग संघटित संघर्षात असल्याची माहिती कुंभकर्ण,शासन प्रशासनास व्हावी दिव्यांगाचा निधीची चोरी होऊ नये म्हणुन प्रत्येक गावात बोर्ड अनावरण करून जनतेला दिव्यांग कायद्याची जनजागृती करावी असे प्रतिपादन मलकापुर (खेरडा) ता. किनवट बोर्डाच्या अनावरण मेळ्यात दि.सं.अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल यांनी केले. देशातील पहिले दिव्यांग मंत्रालय निर्मिती केली पण या मंत्रालयात सेवक ते वरीष्ठ कर्मचारी ,प्रतिनिधी दिव्यांगच असल्यास दिव्यांगाचा विकास होईल असेही दिव्यांग संस्थापक डाकोरे पाटिल यांनी माहुर येथे जागताक दिनी मेळाव्यात केले.

किनवट तालुक्यातील मलकापुर (खेरडा) येथे १५ डिसेंबर रोजी शाखेच्या बोर्डाचे अनावरण दिव्यांगाचा मेळावा दिव्यांग वृध्दय निराधार मित्र मंडळ महाराष्टृ दिव्यांग संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल, जि.ऊपअध्यक्ष जराजुभाऊ शेरकुरवार, सरपंच, ग्रामसेवक, पोलीस पाटिल,ग्रा.प. चे सदस्य, दिव्यांग सं.सर्व कार्यकारणी अनेक मान्यवराच्या ऊपस्थित बोर्डाचे अनावरण करून दिव्यांग मेळ्याला सुरूवात करण्यात आली.

येथे दिव्यांगाचा मेळ्याव्यात वरील मान्यवराच्या हस्ते दिप प्राजलन करून मान्यवराचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.दिव्यांग, वृध्द,निराधार मित्र मंडळ महाराष्टृ संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल, प्रमुख पाहुणे जि.ऊपअध्यक्ष राजुभाऊ शेरकुरवार, माहुर ता ऊपअध्यक्ष ऊमेश भगत,सचिव अरविंद राठोड,माहुर श.अध्यक्ष दादाराव कांबळे,म.अध्यक्ष बबिता मार्बतवार,म.सचिव वनिता पेटकुले,वानोळा स.प्रमुख सुपळकर सरपंच,ग्रामसेवक, पो.पाटिल अनेक मान्यवर दिव्यांग बांधवासाठी काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते दिव्यांगाचा सत्कार संघटनेच्या वतीने करण्यात आला.

कार्यक्रमाचे सुरेख सुत्रसंलन ग्रा.पं.चे सदस्य यांनी केले. प्रस्ताविक मार्गदर्शन ता अध्यक्ष अंकुश राठोड यांनी कार्यक्रमाचा ऊध्देश सर्व दिव्याग बांधवाना संघटितपणे संघर्षासाठी गाव तिथे शाखा करण्याचे अव्हाहण केले. जिल्हा ऊपअध्यक्ष राजुभाऊ शेरकुरवार यांनी दिव्यांगाना संघटित करण्यासाठी डाकोरे साहेबानी प्रयत्न केल्यामुळे आज आपल्या संघर्षामुळे मंत्रालय करण्यात आले या सरकारचे मी आभार व्यक्त करते नुसते मंत्रालय झाल्याने प्रश्न सुटत नसतात म्हणुन आपण सर्वानी चंपतराव डाकोरे सोबत लाढाईत सामिल व्हावे गरज पडल्यास मला आवाज द्या मी आपल्या सोबत आहे असे अश्वासन दिले. ग्रामसेवक मॉडमने ग्रामपंचायतचा दिव्यांग निधी,घरकुल चे वाटप केले आहे आपल्या समस्या मी सोडविण्यासाठी मी आपल्या सोबत असल्याचे अश्वासन दिले.

यावेळी पत्रकार किनवट महिला अध्यक्ष बालीताई जानगेनवाड, ऊमेश भगत, ईत्यादीचे मार्गदर्शन झाले अध्यक्षिय मार्गदर्शन संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल यांनी दिव्यांग बांधवाना सर्व सामान्य जनतेसारखे जीवन जगता यावे म्हणुन शासनाने अनेक वेळा कायदे,शासन आदेश देऊन न्याय मिळत नसल्यामुळे दिव्यांग,वृध्द, निराधार,मित्र मंडळ महाराष्टृ या संघटनेच्या वतीने सर्वानी संघटित करण्याचा प्रयत्न केला आपण सर्वानी मला सहकार्य केल्यामुळे आज आपणास कुठेतरी न्याय मिळत आहे,गावपातळीवर निधी,सवलती,एवढेच नव्हे तर आपल्या व्यंगावर बोलणे सुध्दा बंद झाले ते शासनाने दिव्यांग कायदा २०१६ च्या कलम ९२,९३ प्रमाणे आपल्या शरीराच्या व्यंगावर बोलले तर फार मोठा गुन्हा नोंद होतो त्यांची माहिती आपणास व्हावी म्हणुन गाव तिथे दिव्यांग संघटनेच्या बोर्डाचे अनावर नांदेड जिल्यात १८२ व्या बोर्ड शाखेचे अनावरण आपण ऊत्साहात केला.

आपण संघर्ष करूनहि न्याय मिळत नसलेल्या पंधरा प्रश्नासाठी येणाऱ्या विधीमंडळात अधिवेशनात दिव्यांगाच्या प्रश्नावर लक्षवेधी मांडण्यासाठि मी चार आमदाराशी चर्चा करून निवेदन दिले आपण आपल्या मतदार सं.तील आमदाराना भेटुन निवेदन देऊन प्रश्न मांडण्याची विंनती करावी. व जिल्हातील प्रश्नाला न्याय हक्क मिळण्यासाठि जिल्हाअधिकारी नांदेड मार्फत मुख्यमंत्री,राज्यपाल,ईतर मंत्र्याना निवेदनातील प्रश्न २६ डिसे.२०२२ पर्यंत न्याय मिळाला तर २७ डिसे.२०२२पासुन न्याय हक्क मिळेपर्यत बेमुध्द धरने अनेक आंदोलनात सहभागी व्हावे असे अव्हाहण दि,वृ.नि,मि,म. म.संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल यांनी केले. कार्यक्रमाचे आभार किनवट ता. सचिव गणेश मलकापुरकर यांनी केले.

या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठि किनवट ता अध्यक्ष अंकुश राठोड,म.अध्यक्ष बालीताई जानगेनवाड,ता. सचिव गणेश मलकापुरकर,शा.अध्यक्ष शेख ईलिस शा. ऊपअध्यक्ष महेश आत्राम,सचीव नागोराव कुडमेथे, कोषअध्यक्ष आडे दिलीप,म अध्यक्ष बेबिताई जाधव सचिव आरती जाधव, सर्व कार्यकारणी सदस्य,ईत्यादीने परिश्रम करून यशस्वी केला असे प्रसिध्दी पत्रक दिले.

संबंधित बातम्या वाचा

Leave a Comment

nandednewslive.com या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेत स्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Visitor counter NNL

Copyright @ 2011-2023 Online Social News Live Channel All Right Reserved -Developed & Designed by M&D Infotech Latur, Call – 86687 76434 

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
error: Content is protected !!