Saturday, January 28, 2023
Home Uncategorized “IIB महा FAST” ११वीतून १२वी मध्ये प्रवेश परीक्षेला राज्यभरातून उदंड प्रतिसाद -NNL

“IIB महा FAST” ११वीतून १२वी मध्ये प्रवेश परीक्षेला राज्यभरातून उदंड प्रतिसाद -NNL

"आयआयबीएन्स "ही ओळख निर्माण होण्यासाठी लातूर - नांदेड - पुणे येथील परीक्षा केंद्रावर अवतरला विद्यार्थ्यांचा महासागर

by nandednewslive
0 comment

हजारो विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा ; हजारो विद्यार्थ्यांना मिळणार अंशतः किंवा १००% टक्के स्कॉलरशिप

लातूर/नांदेड। देशभरात सर्वाधिक डॉक्टर घडविणारी अग्रगण्य शैक्षणिक संस्था म्हणून नावलौकिक प्राप्त करणाऱ्या आयआयबी इन्स्टिट्यूटचा विद्यार्थ्यांच्या हितासाठी महत्वकांक्षी उपक्रम असलेल्या “IIB महा FAST” या देशातील सर्वात मोठ्या स्कॉलरशिप परीक्षेला विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद मिळाल्याचे पहावयास मिळाले. “IIB महा FAST” ही फ्री ऍडमिशन कम स्कॉलरशिप टेस्ट ११ डिसेंबर रोजी संपन्न झाली, या परीक्षेला संपूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या हजारो विद्यार्थ्यांनी आयआयबीच्या नांदेड, लातूर आणि पुणे येथील कॅम्पसला अलोट गर्दी करत ऑफलाईन पद्धतीने परीक्षा दिली.

दरवर्षी आयआयबी फास्ट या परीक्षेच्या माध्यमातून गुणवंत विद्यार्थ्यांना १०० टक्के किंवा अंशतः स्कॉलरशिप मिळत असते. डॉक्टर होण्याचे स्वप्न उराशी बाळगून नीटची तयारी करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना या परीक्षेची वर्षभर प्रतीक्षा असते. फिस मधे सवलत व आयआयबी सारख्या देशात सर्वोत्कृष्ट असलेल्या क्लासमध्ये तेही सलेक्टेड बॅच मध्ये शिक्षणाची संधी या परीक्षेच्या माध्यमातून मिळत असते. यंदा “IIB महा FAST” मध्ये विद्यार्थ्यांचे हित पाहता अनेक नाविन्यपूर्ण बदल करण्यात आले आहेत.

या परीक्षेत आपली गुणवत्ता सिद्ध केलेल्या हजारो विद्यार्थ्यांना वर्षभर निःशुल्क मार्गदर्शन केले जाणार आहे. महाफास्ट परीक्षेतील गुणांच्या आधारे विविध बॅचसाठी प्रवेश मिळणार असून त्यात एम्स 50, संकल्प, मिनी संकल्पसह इतर बॅचेसचा समावेश असेल. जे विद्यार्थी नांदेड, लातूर, पुणे येथे नीटच्या तयारीसाठी आले परंतु त्यांची ११ वीची परीक्षेची तयारी व्यवस्थित झाली नाही त्यांची परिपूर्ण तयारी व्हावी यासाठी यंदा आयआयबी फास्ट परीक्षा लवकर होत आहे, जेणेकरून या विद्यार्थ्यांसाठी 15 जानेवारीपासून नवीन बॅच सुरू होणार आहे. ही बॅच 15 जानेवारी 2023 ते 31 डिसेंबर 2023 या कालावधीत होणार असून यामध्ये विद्यार्थ्यांचा इयत्ता १२वी आणि इयत्ता ११ वीच्या अभ्यासक्रमाची परीपूर्ण तयारी करून घेण्यात येणार आहे.

banner

दरम्यान, पार पडलेल्या “IIB महा FAST” परीक्षेदरम्यान टीम आयआयबी व सर्वोत्कृष्ट आयआयबी पॅटर्न बद्दल प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मनात कुतूहल व आकर्षण दिसून आले. 12 सोबत अकरावीचा पूर्ण अभ्यासक्रम आयआयबी 1 जानेवारी ते 31 डिसेंबर या एका वर्षात पूर्ण करणार हा विश्वास विद्यार्थ्यांनी व्यक्त केला व आयआयबी चे मनापासून आभार मानले. विद्यार्थी हिताची IIB महा FAST परीक्षा आयोजित केल्याबद्दल सर्व पालकांनी टीम IIB चे व्यवस्थापनाचे मनःपूर्वक आभार मानले. सोबतच आयआयबी महा फास्ट परीक्षेच्या परिपूर्ण नियोजन व वीणा अडथळा सुरळीत आयोजना बद्दल IIB टीम चे खुप खुप कौतुक केले.

आयआयबी चे सर्व विद्यार्थी, ट्युशन एरिया परिसरातील विद्यार्थी व बाहेर गावावरून आलेल्या विद्यार्थी पालकांचे IIB महा FAST परीक्षेला उस्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल सर्व IIB टीम ने मनापासून आभार मानले.

मागील तब्बल २३ वर्षांपासून आयआयबीने हजारो डॉक्टर घडविले आहेत. आधी नांदेड, नंतर लातूर आणि आता पुणे येथेही आयआयबी इन्स्टिट्यूटने आपल्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाची छाप सोडली असल्यामुळे आयआयबी इन्स्टिट्यूट घराघरात पोहचली आहे. “आयआयबी मध्ये प्रवेश म्हणजे AIMMS, MAMC या राष्ट्रीय पातळीवरील वैद्यकीय महाविद्यालयाबरोबरच देशभरातील नामांकित मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश नक्कीच!” हे समीकरण रुजले आहे. पालकांच्या मनात असलेला हा विश्वास रविवारी हजारो विद्यार्थ्यांच्या उपस्थितीवरुन दिसून आला.

संबंधित बातम्या वाचा

Leave a Comment

nandednewslive.com या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेत स्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Visitor counter NNL

Copyright @ 2011-2023 Online Social News Live Channel All Right Reserved -Developed & Designed by M&D Infotech Latur, Call – 86687 76434 

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
error: Content is protected !!