Sunday, January 29, 2023
Home हदगाव अधिवेशन काळात विकासाठी जनतेचा सवाल ! हदगाव तालुका अनेक समस्यांनी ग्रासल -NNL

अधिवेशन काळात विकासाठी जनतेचा सवाल ! हदगाव तालुका अनेक समस्यांनी ग्रासल -NNL

विधानसभाक्षेञाचे आमदार व खासदार सभागृहात प्रश्न माडतील काय ...?

by nandednewslive
0 comment

हदगाव, शेख चांदपाशा। नादेड जिल्ह्यातील सर्वात जुना हदगाव तालुका म्हणून ओळख विकासापासुन कोसो दुर आहे. तालुक्यात रेल्वे, राष्ट्रीय महामार्गचे काम रखडलेले आहे. तालुक्यातील शासनाकडून प्रचंडनिधी  उपलब्ध होत आहे. पण कामाचा दर्जा पाहता निधीच योग्य वापर होत नसल्याच दिसुन येत आहे. 

ग्रामीण भागातील रोडच्या  कामात प्रचंड भ्रष्टाचार हदगाव तालुक्यातील विविध प्रशासकीय कार्यालय मध्ये असलेले प्रमुख अधिका-याचे रिक्त पद त्यावर कहर म्हणजे असलेले प्रभारी अधिकारी या मुळे कुणाचे ही नियंत्रण दिसुन येत नाही  व गेल्या10वर्षापासुन  हदगाव नगरपरिषद ताब्यात होती काही संधीसाधुनी मी  विद्यमान आमदाराच्या जवळचा म्हणून कामे मिळवली बोगस  कामे .. अश्या एक ना अनेक समस्यांनी ग्रासले असुन या मुळे नागरिक कमालीचे वैतागले दिसुन येत आहे.

हदगाव तालुक्यात वर्धा- यवतमाळ नादेड नवीन रेल्वे प्रकल्पकरिता गेल्या 10वर्षापासुन रेल्वे प्रशासनाने शेतक-याच्या जमीनी अधिग्रहण केलेल्या आहेत  माञ या नवीन रेल्वेच काही कुठेच तालुक्यात काम दिसत नाही विशेष म्हणजे या नवीन रेल्वे प्रकल्प मध्ये 40%टक्के वाटा राज्यशासन व 60%वाटा केद्रशासनाचा आहे या बाबतीत गेल्या 10वर्षात या बाबतीत हदगाव विधानसभेत कोणत्याही आमदाराने या बाबतीत प्रश्न माडलेला दिसुन येत नाही इतकेच नव्हे तर या भागाच्या खा. हेंमत पाटील यांनी पण संसदेत हा प्रश्न माडलेला नाही.

हे खेदाने नमूद करावाशे वाटते हदगाव शहरातुन राष्ट्रीय महामार्गच काम गेल्या पाच वर्षा संथपणाने चालु आहे हे राष्ट्रीय महामार्ग हदगाव तालुक्याच्या दृष्टीने फार म्हत्वाच असुन गोजेगाव ते  वारंगा या मार्गाच काम व पुलाचे काम रखडलेले असुन या अर्धवट कामामुळे या मार्गावर अनेक अपघात झालेले आहे अनेकाना आपला मौल्यवान जीव गमवावा लागला आहे तरी या बाबत आमदार खासदार यांनी गार्भियांन लक्ष दिल्याचे दिसुन येत नाही.

या बाबतीत भारतीय राजमार्ग प्राधिकरण अधिका-याशी विचारणा केली असता ते काही तरी माहीती देवून वेळ मारुन नेत आहेत. ते आमदार व खासदार शिवाय कुणाला ही जुमानत नाहीत. पण ह्या दोघा आमदार खासदार ना याकडे लक्ष दयायला हवे अशी जनतेची अपेक्षा आहे. विशेष म्हणजे या मार्गावर गोजेगाव ते वारंगा जे की घनदाट वृक्ष या मार्गासाठी तोडण्यात आली होती. त्या बदल्यात किती वृक्ष लावण्यात आली या बाबतीत विचारणा केली असता एका माहीती नुसार 100%टक्के वृक्ष लावल्याचा लेखी संबंधित विभागाकडून माहीती देण्यात आलेले आहे.

या बाबतीत वास्तविक पहाता गोजेगाव ते वारंगा या राष्ट्रीय महामार्गावर गाजर गवत शिवाय काहीच दिसत नाही ही वस्तुस्थिती आहे. यावर पण या हिवाळी अधिवेशनात विधानसभेत व संसदेत आमदार खासदार यांनी प्रश्न उपस्थित करायाला हवे. हदगाव न.पा. गेल्या10वर्षापासुन काँग्रेसचे आ.माधवराव .जवळगावकर यांच्या ताब्यात असुन त्यांच्या नावे काही कंञाटदारांनी शहरात काही विशिष्ट भागातच बोगस विकास कामे केलेली आहे.

या कामाचा दर्जा पाहीले तर सत्य परिस्थिती दिसुन येईल हदगाव शहरात रोडवर निधी न टाकता जिथे अवश्यकता नाही तिथे टाकण्यात आला. व झटपट थातुर मातुर कामे करुन बीले उचलण्यात आलेली आहे ही वस्तुस्थिती आहे. आज शहरात गेल्या पंधरा वर्षापासुन शहरातील मुख्य प्रभागातील  रोडवर कोणत्याच प्रकारच निधी न टाकल्या मुळे शहरातुन जातांना अस वाटु लागते आपण ऐखाद्या डोंगराच्या पाऊलवाटेने जात असल्याच भास होत आहे  याकडे पण विद्यमान आमदारानी लक्ष देणे गरजचे आसल्याच मत अनेक ञस्त नागरिकाँनी व्यक्त केलं.

किमान अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर तरी … यापुर्वी माजी आ.सुभाष वानखेडे व स्वर्गीय माजी खा राजीव सातव हे विधानसभा व लोकसभाच्या पार्श्वभूमीवर तालुक्याच्या ठिकाणी आवर्जून नगरसेवक नगराध्याक्ष संरपच विविध राजकीय पक्षाचे मत जाणुन घ्यायचे व ते सभागृहात माडायचे पण पण सध्या अशी परिस्थिती दिसुन येत नाही….

संबंधित बातम्या वाचा

Leave a Comment

nandednewslive.com या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेत स्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Visitor counter NNL

Copyright @ 2011-2023 Online Social News Live Channel All Right Reserved -Developed & Designed by M&D Infotech Latur, Call – 86687 76434 

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
error: Content is protected !!