
नविन नांदेड। स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत नुकत्याच संपन्न झालेल्या C – झोन मधील तायक्वांदो (महिला) स्पर्धेत खेळाडूंनी वजनी गटात दोन सुवर्णपदक व एक रौप्य पदक प्राप्त करून वसंतराव नाईक महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे.

तायक्वोंदो ४६ किलो वजन गटामध्ये बी.एस्सी प्रथम वर्षाची कु. दुधमल वैष्णवी विनोद हिने गोल्ड मेडल प्राप्त केले तर बी. कॉम प्रथम वर्षाची कु.पांचाळ प्रियंका संतोष हिने सिल्वर मेडल प्राप्त केले. आणि ४६ते ४९ किलो वजन गटात बी. एस्सी. प्रथम वर्ष कु.कांबळे संपदा वसंत हिने गोल्ड मेडल प्राप्त केले. त्याबरोबरच बॉक्सिंग स्पर्धेत (पुरूष ) ५१ ते ५४ किलो वजन गटामध्ये बी.ए .तृतीय वर्षाचा धुळे रोहीत गौतम या विद्यार्थ्यांने सुवर्ण पदक प्राप्त केले.

या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ.नानासाहेब जाधव ,अॅड.श्रीनिवास जाधव, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शेखर घुंगरवार,उपप्राचार्य डॉ.व्ही.आर राठोड आणि क्रीडा विभागाचे प्र.संचालक डॉ. एस. जी. मोरे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

