Monday, February 6, 2023
Home कंधार स्वच्छता , आरोग्य,शिक्षण या मुलभूत सोयी सुविधेकडे लक्ष द्या – नागरिकांची मागणी -NNL

स्वच्छता , आरोग्य,शिक्षण या मुलभूत सोयी सुविधेकडे लक्ष द्या – नागरिकांची मागणी -NNL

by nandednewslive
0 comment

उस्माननगर, माणिक भिसे। ग्रामीण भागात खुप वर्षांपुर्वी जनतेला मुलभूत सुविधा म्हणून अन्न, वस्त्र , निवारा या तीन गोष्टी कडे अन्यन साधारण महत्व दिले जात होते.पण आज २१ व्या शतकात मानवाला या गोष्टी बरोबर आरोग्य,स्वच्छता, शिक्षण हे महत्त्वाचे साधन बनले आहे ,. म्हणून पुढाऱ्यांनी व स्वता: ला मी नेता ,कार्यकर्ता म्हणून मिरवणाऱ्यानी या सोयी सुविधेकडे लक्ष द्यावे अशी मागणी समोर येत आहे.

नागरिकांनी दर पाच वर्षांनी आप आपल्या वार्डाच्या नेत्यांच्या व कार्यकर्त्यांच्या विश्वासावर सांगितलेल्या उमेदवारांना प्राधान्य देवून निवडणुकीत मतदान देतात.आपल्या महाराष्ट्रातील गावोगावी खऱ्या लोकशाही मार्गाने निवडणूका होताना दिसून येतात.लोकांनी लोकांच्या कल्याणासाठी चालवलेल राज्य म्हणजेच लोकशाही….ही लोकशाहीची व्याख्या दिवसेनदिवस लोप पावत जात असल्याचे दिसून येत आहे.आपल्या भारतीय संस्कृती मध्ये सण, उत्सवात प्रत्येकांना आनंद वाटतं आसायाचा ….

दसरा ,दिवाळी ,धुलिवंदन ,पोळा , गणपती उत्सव, जयंत्या ,हे उत्सव काही महीन्यापासून प्रत्येकांच्या घरा घरात ….गल्ली बोळात…. आनंदाचे वातावरण पसरले जायाचे….बाई लेकीला आणण्यासाठी घरातल्या प्रत्येक सदस्याची धडपड …घाई.दिसून येत असे तो आनंद आजच्या कलीयुगात पहायला मिळत नाही.हे सत्य नाकारू शकत नाही.तसेच निवडणुकीत देखील हेच स्वरूप दिसून येते.निवडणूकीच्या काळांत पॅनल प्रमुख व नेते मंडळी घरोघरी जाऊन मतदारांना हात जोडून मतदान करण्यासाठी विनवाणी करताना आढळून येतात.

आम्ही हे करू …..ते करू……तुम्हाला आमूक मिळवून देऊ….. असे अनेक आश्र्वासन देतात.सत्ताधारी व विरोधक यांनी गावाच्या ज्वल्त प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.गावा गावात स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, रस्ते , आदी विकास कामांसाठी शासन स्तरावरून लाखो रुपये निधी मंजूर केला जातो. हे कामे करण्यासाठी महीन्याला विशेष मासिक मिटींक बोलाविण्यात येते.या मिटिंगमध्ये गावाच्या विकास कामांसाठी चर्चा करून कामे करण्यासाठी परवानगी घेतल्या जाते. गावातील नाली काढण्यासाठी व गावं स्वच्छ झाडण्यासाठी कर्मचारी लावणे ., दिवे बत्ती बंद चालू करण्यासाठी कर्मचारी यांची संख्या घटत चालली आहे.

banner

उस्माननगर परिसरातील अनेक गावात रस्त्याची दुरवस्था आजून , व लाईट चोविस तास चालूच दिसतात , शैक्षणिक परिसरात दुर्गधी दिसून येते. या गोष्टी कडे लक्ष न देता टक्केवरीत अनेकांना इंटरेस्ट दिसून येत आहे.काही गावातील राजकारण गटा तटाचे पहायाला मिळते.निवडून येतात एकाच पॅनल मधून ….पण विरोध मात्र सत्ताधारी यांनाच….. विरोधकांनी काही कामासाठी हाट्ट धरायला हवा पण ते न करता सत्तधारी विरोधकांची भूमिका निभावताना दिसून येतात. शासन स्तरावरून लाखो रुपये निधी उपलब्ध करून देण्यात येतो.पण या निधीतून कोणते काम विधायक करता येईल या कडे लक्ष देणे गरजेचे असते.गावागावात स्वच्छतेची ,शिक्षण, आरोग्य या मुलभूत सुविधांची तिन तेरा वाजल्याचे दिसून येते.

केंद व राज्य सरकार आरोग्य, शिक्षण, रस्ते, स्वच्छाता यावर लाखो रुपये निधी खर्च करीत आहे.पण परिसरात या गोष्टी कडे बगल देऊन इतरत्र खर्चा करण्यातच धन्यता मानतात.गावागावात नाली ,स्वच्छता रस्ते याकडे लक्ष नाही. नाल्या घाणीने भरल्यामुळे आरोग्य वर परिणाम होत आहे.डासाची पैदास झाल्याने विविध आजारांचे प्रमाण वाढत आहे.अस्वच्छतेमुळे दुर्गधी वाढली . शासनाने दिलेल्या विकास कामे बोगस होत असल्याचे ऐकण्यात येते.दिलेल्य वेळेत काम पूर्णपणे पारदर्शक होत नसल्याचे बोलल्या जातात.याकडे शासनाने लक्ष वेधून ग्रामीण भागातील मुलभूत सुयी सुविधे कडे लक्ष द्यावे असी मागणी नागरिकांकडून होत आहे.

संबंधित बातम्या वाचा

Leave a Comment

nandednewslive.com या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेत स्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Visitor counter NNL

Copyright @ 2011-2023 Online Social News Live Channel All Right Reserved -Developed & Designed by M&D Infotech Latur, Call – 86687 76434 

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
error: Content is protected !!