लोहा| गरजवंत व गोरगरिबांच्या मदतीला धावून जाणारे अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करणारे लोहा येथील युवा उद्योजक तथा शिवसंकल्प प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिपक पाटील कानवटे यांना नांदेड येथे सत्यशोधक समाजभूषण पुरस्कारांने सन्मानित करण्यात आले.
नांदेड येथे डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्ष 2022 व २० वे आंबेडकरीवादी साहित्य संमेलनात सत्यशोधक समाजभूषण पुरस्कारांने सन्मानित करण्यात आले. लोहा येथील युवा उद्योजक तथा शिवसंकल्प प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिपक पाटील कानवटे यांनी सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य विषयक आदी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याची दखल घेऊन त्यांना २०२२ च्या सत्यशोधक समाजभूषण पुरस्कारांने सन्मानित करण्यात आले.
यावेळी आंतरराष्ट्रीय किर्तीचे आंबेडकरवादी लेखक, संशोधक, विचारवंत डॉ.सुरज एंगडे (अमेरिका), जेष्ठ विचारवंत आंबेडकरवादी साहित्यिक अर्जुन डांगळे, महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध गायीका मंजुषाताई शिंदे संस्थेचे अध्यक्ष कोंडदेव हटकर, स्वागत अध्यक्ष मंगेश कदम, सुप्रसिद्ध साहित्यिक विलास सिंदगीकर, आदी मान्यवर उपस्थित होते.