
नांदेड। महाराष्ट्र अॅथलेटिक्स संघटनेच्या वतीने राज्यस्तरीय क्रॉसकन्ट्री स्पर्धा 25 डिसेंबर रोजी परभणी येथे होणार असून या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नांदेड जिल्हा अॅथलेटिक्स संघटनेद्वारे जिल्हास्तरीय क्रॉसकन्ट्री अजिंक्य पद स्पर्धेचे आयोजन 20 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 8 वाजता गुरुकुल इंग्लिश स्कूल असदवण शाळेच्या मैदानात ग्रामीण तंत्रनिकेतन गेट ते पांगरी रोड पाईप लाईन,श्री गुरु गोविंदसिंघजी इंजिनिअरिंग कॉलेज च्या अलीकडे विष्णुपुरी जवळ नांदेड या रोडवर करण्यात आले आहे.

या ठिकाणी आयोजन केले आहे.(ठिकाण माहीत नसेल तर खालील मोबाईल क्रमांक वर संपर्क साधावा) स्पर्धेला येतांना खेळाडूंनी आधार कार्ड, जन्म प्रमाणपत्र, बोर्ड प्रमाणपत्र व दोन पासपोर्ट फोटो सोबत आणावे. मुला-मुलींसाठी 16, 18 व 20 वर्षीय तसेच खुला पुरुष महिला गट राहणार आहे. कामगिरी पात्र खेळाडूसच पुढील स्पर्धेसाठी सहभाग घेता येईल.

जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन असोसिएशनचे अध्यक्ष राजे खंडेराव देशमुख, डॉ. दि.भा. जोशी डॉ. मापारे डॉ. उमेश भालेराव, डॉ. संजय पतंगे,जिल्हा क्रीडाधिकारी राजेश्वर मारावार, महेंद्र कुंडगुलवार, किशोर पाठक, कुमार कुलकर्णी, शिवकांता देशमुख,विनोद गोस्वामी, नारायण सूर्यवंशी सचिव प्रलोभ कुलकर्णी, मुंजाजी काकडे, अमरिकसिंग वासरीकर, संतोष वाकोडे,भगवान नागरगोजे, बालाजी गाडेकर, विष्णू पूर्णे,बळीराम लाड,शेख शब्बीर, संतोष आनेराव,कृष्णा तलवारे,अमृत जाधव,ज्ञानेश्वर कोंडलांडे, नंदू जाधव,बालाजी भवणकर, यांनी केले आहे.

विशेष सुचना – क्रॉसकंट्री स्पर्धेसाठी खालील प्रमाणे वयोगटासाठी जन्मतारखा खालील प्रमाणे आहेत याची स्पर्धकांनी नोंद घ्यावी. 1) 16 वर्षातील मुले-मुली 09 जानेवारी 2007 आणि 08 जानेवारी 2009 दरम्यान (मुले2km-मुली-2km), 2) 18 वर्षातील मुले-मुली 09 जानेवारी 2005 आणि 08 जानेवारी 2007 दरम्यान जन्म(मुल6km-मुली-4km), 3) 20 वर्षाखालील मुले मुली 09 जानेवारी 2003 आणि 08 जानेवारी 2005 दरम्यान जन्म(मुले8km-मुली-6km ), 4) पुरुष महिला /खुला गट-मुले-मुली 10km, 5) स्पर्धेची फी 100 रुपये राहणार आहे.प्रथम जिल्हा नाव नोंदणी फी (जिल्हारजिस्ट्रेशन)150रू आहे.

याची सर्व स्पर्धकांनी नोंद घ्यावी.सर्वांना स्पर्धे आधी राष्ट्रीय पातळीवर संघटनेची नोंदणी पुढील वेबसाईट वर करणे आवश्यक आहे ज्यांनी पूर्वी नोंदणी केली आहे त्यांनी आपला रजिस्ट्रेशन क्रमांक सोबत घेऊन यावा https://indianathletics.in/afi_ors_test/new-user-registration त्यानंतर जिल्हा संघटना नोंदणी प्रत्यक्ष स्पर्धेच्या वेळी करावी लागेल. याची सर्व खेळाडूंनी नोंद घ्यावी. अधिक माहीती साठी प्रलोभ कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधावा – 8625021219 / 9421819020.

