
उस्माननगर, माणिक भिसे। येथील शहीद जवान हणमंत काळे यांच्या दहाव्या स्मृतिदिनानिमित्त उस्माननगर विभाग ग्रामीण मराठी पत्रकार संघाच्या वतीने व राज्य पुरस्कार प्राप्त केंद्रप्रमुख यांच्या वतीने प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी विविध कार्यक्रमास नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला
यावेळी उस्माननगर विभाग ग्रामीण मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश लोखंडे, उपाध्यक्ष माणिक भिसे, लक्ष्मण कांबळे,राज्यपुरस्कार प्राप्त केंद्रप्रमुख जयवंतराव काळे , सरपंच श्रीमती गयाबाई घोरबांड, उपसरपंच सदर बाशीद शेख, माजी पं.स.सदस्य व्यंकटराव पाटील घोरबांड, ग्रामसेविका सौ.डि.जी.शिंदे – माने , संभाजी काळम पाटील, यांच्या सह ग्रामपंचायत सदस्य , नागरिक,रुग्ण उपस्थित होते.

दरवर्षी प्रमाणे याही वर्षी उस्माननगर येथील शहीद जवान प्रतिष्ठानचे आयोजक तथा ग्रामपंचायत सदस्य शिवशंकर काळे यांच्या वतीने दि.१९ डिसेंबर रोजी येथील शहीद जवान हणमंत काळे यांच्या दहाव्या स्मृतिदिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये नोंदणीकृत इमारत बांधकाम व इतर बांधकाम कामगार करणा-या कुटुंबा साठी आरोग्य शिबिराचे आयोजन ग्रामपंचायत कार्यालय येथे करण्यात आले होते.तसेच गोरगरिब वयोवृद्ध ,दिव्यांग , विधवा ,माता भगिनी तसेच आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांची तपासणी करण्यात आली.

गरजू गोरगरिब वयोवृद्ध महिला पुरुष ५१ लाभार्थ्यांना अंगावर घेण्यासाठी ( रजाई) चादरीचे वाटप करण्यात आले. सध्या हिवाळा असल्याने मायेची ऊब मिळावी म्हणून रजई चे वाटप करण्यात आले. ग्रामपंचायत कार्यलय येथे सकाळ पासून नोंदणीकृत इमारत व इतर बांधकाम कामगार मजूरांच्या कुटूंबातील सदस्याची मोफत आरोग्य तपासणी H L L टिम व हिंद लॅब नांदेड चे संतोष गायकवाड ( कोऑरडीनेटर ) यांच्या मार्गदर्शनाखाली नविद शेख ,राजू गवलवाड ,आनंद हाटकर ,रितिका चिवळे ,असपाल गायकवाड ,निळकंठ गोरडवार यांनी आरोग्याची तपासणी करून योग्य असे मार्गदर्शन केले. या शिबिराचे अनेक बांधकाम कामगारांनी व लाभार्थ्यांनी लाभ घेतला. राहिलेल्या नोंदणीकृत इमारत बांधकाम कामगार मजूरांच्या घरोघरी जाऊन मोफत आरोग्य तपासणी करण्यात येणार असल्याचे संयोजक यांनी कळविले आहे.

