लोहा| शालेय क्रीडा स्पर्धेत पानभोसी येथील नेताजी सुभाषचंद्र बोस माध्यमिक व उच्च माध्यमिक . विदयालयांच्या विद्यार्थ्यांना जिल्हा स्तरीय क्रीडा स्पर्धेत तिहेरी उडी, गोळा फेक ,लांब उडी,बॉक्सिंग, जुडो या वैयक्तिक मैदानी क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले असून विभागीय पातळीवर या खेळाडूंची निवड झाली आहे. प्राचार्य राजीव भोसीकर व मार्गदर्शक शिक्षक यांच्यामुळे शाळेस हे यश संपादन झाले.
जिल्हा स्तरीय मैदानी स्पर्धा पार पडल्या यात पानभोशी येथील नेताजी सुभाषचंद्र बोस माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. यात थाळी फेक – कु. माधवी भोसीकर – ( प्रथम ), तिहेरी उडी –जान्हवी भुजबळ ( प्रथम ) महेश गित्ते लांब उडी -महेश गीते ( प्रथम ) ट्रिपल जंम्प् – व्दितीय-, सुभाष केंद्रे, थाळी फेक – , हेमराज यादव ( द्वितीय ) ज्युडो कराटे – प्रथम क्रमांक, – गौरी संगम नागठाणे, किक बॉक्सींग – प्रथम – तनुजा गित्ते लांब उडी मध्ये प्रथम क्रमांक मिळविला.
विदयार्थ्यांनी जिल्हा पातळीवर झालेल्या क्रिडा स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले आहड विभागिय पातळीवर होणाऱ्या क्रिडा स्पर्धेसाठी यांची निवड झाली आहे. त्याबदल संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार . ईश्वराव भोसीकर , कॉलेजचे प्राचार्य राजेंद्र भोसीकर, संस्थेचे संजय भोसीकर, जिल्हा उपाध्यक्ष महेश भोसीकर, उपमुख्याध्यापक महंमद फैसलोदीन, पर्यवेक्षक सूर्यावणी एम टी क्रिडा शिक्षक विजय कदम उमाकांत वाखरडकर , शंकर गिते व तसेच ‘ शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विदयार्थ्याचे अभिनंदन केले आहे.