बिलोली। तालुक्यातील कुंडलवाडी येथे गेल्या वर्षभरा पासून निव्वळ ताडी विकण्याचा परवाना असलेल्या परवाना धारक दुकानातुन शरीरास हानिकारक अशी रासायन मिश्र ताडीची होत आहे.या बाबत माजी नगरसेविका आक्रमक झाले असून ही विक्री तात्काळ बंद करण्यात यावी या आशयाचे निवेदन कुंडलवाडीच्या नगरसेविका सौ.पर्यागबाई मुरलीधरराव शिरामे यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथरावजी शिंदे,विरोधी पक्ष नेते ना.अजित पवार, जिल्हाधिकारी व तहसिलदार यांना दिले आहेत.
निवेदकांनी निवेदनात असे नमुद केले आहेत की,तालुक्यातील एक मोठे शहर व बाजारपेठ म्हणून कुंडलवाडी शहराची ओळख आहे.येथे ताडी (शिंदी) पिणाऱ्यांची संख्या बर्यापेकी आहे.अशात जवळपास गेल्या वर्षभरा पासून येथील ताडी विक्री करणारा परवाना धारक ताडी दुकानदार संबंधित उत्पादन शुल्कचे निरिक्षक व कांही वरिष्ठ पातळी वरील अधिकारी यांना हाताशी धरून चक्क रासायन घटकांचा ताडीत वापर करून रासायनिक मिश्र ताडी विकत आहे.हे तज्ञाच्या मते मानवी शरीरास अत्यंत हानिकारक आहे.
हा दुकानदार ताडी प्राशन करणाऱ्या व्यक्तीच्या आरोग्याचा कुठलाच विचार न करता मोठ्या प्रमाणात रसायन मिश्रण केलेली ताडी प्लँस्टीक पिशवीतुन सुध्दा विक्री करत आहे.यासाठी दुकानात बसून पिणार्यासाठी झाकण नसलेल्या काचेच्या बाटल्याचा वापर करण्यात येत आहे.या प्रकारास कारणीभूत असलेल्या ताडी दुकानदार व संबंधित दोषी अधिकारी यांच्यावर तात्काळ कारवाई करावे अन्यथा मला आमरण उपोषणाचा मार्ग स्विकारावा लागेल.