हिमायतनगर,अनिल मादसवार। तालुकास्तरीय खो- खो व क्रिकेट ,कुस्ती स्पर्धा नुकत्याच संपन्न झाल्या असून, खो – खो स्पर्धेत मनिषा आश्रम शाळा पोटा 14 वर्षे मुले ,मुली दोन्ही गट प्रथम आणि 19 वर्ष गट ही पहिला आला आहे. क्रिकेट मध्ये 14 वर्ष वयोगट राजा भगीरथ मा.व उच्च मा. विद्यालय हिमायतनगरने शाळा प्रथम क्रमांक मिळविला आहे.
या खो-खो स्पर्धेचे उदघाटन पो.नि. बी.डी. भूसनुर व मनिषा आश्रम शाळेच्या अध्यक्षा शशीकलाताई राठोड, गट शिक्षणाधिकारी आर.आर. जाधव यांच्या हस्ते स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन करण्यात आले. यावेळी क्रिडा संयोजक के.बी. शेन्नवाड, अनिल मादसवार, मुख्याध्यापक गजानन सुर्यवंशी मु.अ.राठोड, सेवानिवृत मु.अ. ए.आर. अनगुलवार, जी.डी. कापसे यांच्या उपस्थीत झाले. पंच म्हणून माधूरी तिप्पनवार, चव्हाण सर, भावडे सर आदी उपस्थित होते.
तर क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन सेवानिवृत मुख्याध्यापक ए.आर. अनगुलवार, यांच्या हस्ते झाले. यावेळी जी.डी. कापसे, सचिन कळसे, येळवेसर, के.बी. शेन्नेवाड, आठवले सर, आदीच्या उपस्थितीत संपन्न झाले. पंच गणेश रामदिनवार, महेश पल्लेवाड, राहुल डांगे होते.
संपन्न झालेल्या स्पर्धेतील खो- खो 17 वर्ष वयोगट कै. श्रीधरराव देशमुख विद्यालय प्रथम 17 वर्ष वयोगट मुली परमेश्वर विद्यालय प्रथम, क्रिकेट 17 वर्ष वयोगट परमेश्वर विद्यालय विरसनी प्रथम, कै. श्रीधरराव देशमुख सरसम द्वितीय, कुस्ती 14 वर्ष मुले 32 वजनी गटात ओंकार हेंद्रे प्रथम व 45 किलो वजन गटात नागेश गाजलेवार प्रथम , राजा भगीरथ विद्यालय हिमायतनगर , प्रथम,38 किलो वजनी गट राजरत्न कावळे प्रथम, 41 किलो वजनगट शे.रोशन प्रथम दोन्ही श्रीधरराव देशमुख विद्यालय सरसम प्रथम, 17 वर्षे वयोगट कुस्ती 42 किलो वजनगट मध्ये केदार बिच्चेवार, व 50 किलो वजनगटात अमोल बास्टेवाड प्रथम, दोन्ही श्रीधरराव देशमुख विद्यालय सरसम, 46 किलो वजनगटात अ.समद बागवान प्रथम जि.प. हा. हिमायतनगर यांनी बाजी मारली.
या शैक्षणिक वर्षात कोरोनानंतर दोन वर्षाने तालुका स्तरीय क्रीडा स्पर्धा संपन्न झाले आहेत. आॅनलाईन नोंदणीमुळे अनेक शाळा सहभागी होवू शकल्या नाहीत. जि.प.च्या काही शाळांना क्रिडा शिक्षक नाहीत, त्यामुळे जि.प. च्या शाळा जास्त असूनही सहभाग नगण्य होता. खाजगी व आश्रम शाळाचाही कमी सहभाग होता पण जि.प. शाळापेक्षा जास्त होता. सध्या मुलांना मोबाईलचे वेड लागले आहे, त्यामुळे खेळाकडे दुर्लक्ष होत आहे. पालकांनी शिक्षणाबरोबर खेळाकडे लक्ष देणे गरजेचे आहे.