Tuesday, February 7, 2023
Home Uncategorized अखिल भारतीय हॉकी स्पर्धेचे उद्धघाटन गुरुवारी नामवंत 16 संघ प्रदर्शन करतील शैलीदार हॉकी – NNL

अखिल भारतीय हॉकी स्पर्धेचे उद्धघाटन गुरुवारी नामवंत 16 संघ प्रदर्शन करतील शैलीदार हॉकी – NNL

49 वीं स्पर्धेची तयारी पूर्ण : गुरमीतसिंघ नवाब

by nandednewslive
0 comment

नांदेड, रविंद्रसिंघ मोदी| मागील 50 वर्षांपासून राष्ट्रीय खेळ हॉकीच्या प्रसारत महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या नांदेड येथील अखिल भारतीय श्री गुरु गोबिंदसिंघजी गोल्ड एंड सिल्वर कप हॉकी स्पर्धेचे उद्धघाटन गुरुवार, दि. 20 डिसेम्बर रोजी सकाळी 11.30 वाजता सुमारास होत आहे. या स्पर्धेची संपूर्ण तयारी पूर्ण झाली असून विविध राष्ट्रीय संघ आणि अंतर्राष्ट्रीय ख्यातिचे खेळाडूं आपले खेळ कौशल प्रदर्शन करण्यासाठी येथे पोहचत अशी माहिती दुष्ट दमण क्रीडा युवक मंडळाचे अध्यक्ष व नगर सेवक सरदार गुरमितसिंघ नवाब (डिम्पल) यांनी येथे दिली.

नांदेडच्या पावन भूमीत दरवर्षी श्री गुरु गोबिंदसिंघजी महाराज यांच्या प्रकाश पर्वास समर्पित नामवंत हॉकी स्पर्धेची सुरुवात ता. 22 डिसेम्बर रोजी सकाळी खालसा हायस्कुल मिनी स्टेडियम मैदानावर होईल. स्पर्धेचे उद्धघाटन गुरुद्वारा तखत सचखंड हजुरसाहेबचे जत्थेदार संतबाबा कुलवंतसिंघजी, गुरुद्वारा श्री लंगर साहेबचे मुखी संतबाबा नरिंदरसिंघजी कारसेवावाले, संतबाबा बलविंदरसिंघजी कारसेवावाले, गुरुद्वारा बोर्ड अधीक्षक स. शरणसिंघ सोढी यांच्या हस्ते होईल. पहिला हॉकी सामना हॉकी इंडियाच्या निर्देशाने डेक्कन हैदराबाद संघ आणि सैफई हॉस्टल इटावा संघा दरम्यान खेळविला जाईल. स्पर्धेचे नंतरचे सामने साखळी आणि बाद अशा पद्धतीने खेळविले जाणार आहेत.अशी माहिती गुरमीतसिंघ नवाब यांनी सांगितले.

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पंजाब पोलीस जालंधर, सैफई हॉस्टल इटावा, ईएमई जालंधर, डेक्कन हैदराबाद, सेंट्रल रिजर्व पोलीस दिल्ली, आर्टलेरी सेंटर सिकंदराबाद, कस्टम मुंबई, पीएसपीएल पटियाला, वेस्टर्न रेलवे मुंबई, साईं एक्सेलेंसी औरंगाबाद, आर्टलेरी सेंटर नासिक, सुफियान क्लब अमरावती, एक्सेलेंसी हॉकी अकाडेमी पुणे, खालसा यूथ क्लब नांदेड, चार साहिबजादे हॉकी अकाडेमी नांदेड संघ दाखल होत आहेत. ज्यात अंतर्राष्ट्रीय आणि राष्ट्रीय खेळाडू नांदेडला पोहचत आहेत. स्पर्धेतील विजेता संघाना प्रथम, द्वितीय, तृतीय आणि इतर पारितोषिके देण्याचे जाहीर करण्यात आले आहे.

banner

प्रत्येक सामन्यात सामनावीर पारितोषिक देण्यात येईल. तसेच स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू आणि गोलकीपर यांना हि पारितोषकं देऊन गौरव करण्यात येणार आहे. स्पर्धे निमित आंतरराष्ट्रीय व ओल्याम्पीक अनुभव असणारे खेळाडूंचे नांदेड नगरीत आगमन होणार आहे. खेळाडूंच्या राहण्या व खाण्याची सोय आयोजकांतर्फे करण्यात आली आहे. शिरोमणी दुष्ट दमन क्रीडा युवक मंडळाचे अध्यक्ष व नगर सेवक सरदार गुरुमित सिंग नवाब, उपाध्यक्ष जितेंदरसिंघ खैरा, सचिव हरविंदरसिंघ कपूर, कोषाध्यक्ष हरप्रीतसिंघ लांगरी, सहसचिव संदीपसिंघ अखबारवाले, सदस्य महिन्दरसिंघ लांगरी, जसपालसिंघ काहलों, महिंदर सिंघ गाडीवाले, अमरदीपसिंघ महाजन, जसबीरसिंघ चिमा, विजय नंदे सह सेवाभावी युवक मंडळी परिश्रम घेत आहेत. देशभरात नामवंत अशी स्पर्धा पाहण्यासाठी प्रेक्षकांनी मोठ्या संख्येत उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

अंतर्राष्ट्रीय खेळाडू पोहचणार : रघुनाथ वी.आर. (अर्जुन अवॉर्ड विजेता), बलविंदरसिंघ (ओलिंपियन), दीपक ठाकुर (ओलिंपियन), देवेश चव्हाण (अर्जुन अवार्ड विजेता), सिमरनजीतसिंघ (ओलिंपियन), विक्रम राज (अंतर्राष्ट्रीय खेळाडू), हजुरासिंघ व जरमनप्रीतसिंघ (राष्ट्रीय खेळाडू) नांदेड मध्ये दाखल होत आहेत. या स्पर्धेसाठी एक लाखाचे रोख बक्षीश आणि फिरते चषक, द्वितीय आणि तृतीय पारितोषिक, व्यक्तिक पारितोषिक असे ठेवण्यात आले आहे.

संबंधित बातम्या वाचा

Leave a Comment

nandednewslive.com या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेत स्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Visitor counter NNL

Copyright @ 2011-2023 Online Social News Live Channel All Right Reserved -Developed & Designed by M&D Infotech Latur, Call – 86687 76434 

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
error: Content is protected !!