
उस्माननगर, माणिक भिसे। आलेगाव ता.कंधार येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शालेय व्यवस्थापन शिक्षण समितीच्या निवडणूकीमध्ये कंधार- लोहा विधानसभा मतदारसंघातील लोकप्रिय , आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या गटाने वर्चस्व प्रस्थापित केले असुन आध्यक्ष म्हणून आनंदराव पाटील मोरे यांची तर उपाध्यक्ष म्हणून बळवंतराव पाटील मोरे यांची निवड करण्यात आली.


उस्माननगर येथून जवळच असलेल्या मौजे आलेगाव ता.कंधार येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नुकतीच शालेय शिक्षण व्यवस्थापन समिती निवडण्यासाठी शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांना बोलावण्यात आले होते. शाळेत गावातील सर्व गटातील कार्यकर्ते आमने-सामने उभे राहू लागल्याने निवडणूक घेण्याची परवानगी घेतली. मुख्याध्यापक यांनी पालकांची निवडणूक घेतल्याने पालकवर्गानी ही शालेय शिक्षण समिती निवडण्यासाठी प्रतिष्ठेची केली होती.दोन्ही गट आमने-सामने उभे राहून निवडणूक प्रतिष्ठेची केली.


सदरील मतदान हे उपस्थित पालक कार्यकर्ते मधून चिट्या टाकून सर्व प्रथम सदस्याची निवड करून सदस्यामधूनच अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची बिनविरोध निवड करून आ.श्यामसुंदर शिंदे यांचे खंदे समर्थक असलेले आनंदराव पाटील मोरे यांची अध्यक्ष म्हणून तर उपाध्यक्ष म्हणून बळवंतराव मोरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या प्रसंगी आलेगाव येथील सरपंच पाटील, म.गा.तंटामुक्त समितीचे अध्यक्ष दादाराव पाटील मोरे ,पोलीस पाटील वसंतराव मोरे ,मुख्याध्यापक,प्रभाकर कुलकर्णी, खुशालराव मोरे ,यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक यांनी नवनिर्वाचित समितीचे सत्कार करून अभिनंदन करण्यात आले.


आलेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा कंधार लोहा विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय कर्तव्यदक्ष आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या.
