
भाजपा तालुका सरचिटणीस हेमंत अप्पा खंकरे व आ.डॉ.तुषार राठोड मित्र मंडळ मुक्रामबाद च्या वतीने दि. २५ डिसेंबर रोजी ग्रामपंचायत मैदानावर भव्य मोफत सर्व रोग तपासणी,उपचार आणी शस्त्रक्रिया शिबिर व भव्य कुस्त्यांचे आयोजन …!
मुखेड, रणजित जामखेडकर| मुखेड – कंधार विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय नेतृत्व कार्यसम्राट आ.डॉ.तुषारजी राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा तालुका सरचिटणीस हेमंत बंडप्पा खंकरे व आ. डॉ तुषार राठोड मित्र मंडळ मुक्रामबाद आणी भक्ती मल्टिस्पशिलेटी हाॅस्पिटल नांदेड,उदयगीरी लाॅयन्स क्लब उदगीर च्या संयुक्त विद्यमाने मुक्रमाबाद शहरातील ग्रामपंचायतीच्या मैदानावर दि.25 डिसेंबर रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

लोकप्रिय नेतृत्व मुखेड – विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आ. तुषार राठोड यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मुक्रामाबाद सह परिसरातील नागरिकांचे निरोगी आरोग्य रहावे, नागरिकांना दीर्घायुष्य लाभावे व परिसरातील रुग्णांना मोफत आरोग्य सुविधा मिळावी अशी दुरदृष्टी ठेवून दि. 25 डिसेंबर रोजी मुक्रामबाद शहरातील ग्रामपंचायतीच्या मैदानावर भव्य मोफत सर्व रोग तपासणी,उपचार, मोफत औषधी वाटप आणी हाडाचा विकार असलेल्या ५० वर्षांवरील नागरिकांची बिडीएस तपासणी,मधुमेह, शुगर व रक्त मोफत तपासणी करून उपचार केला जाणार आहे तसेच परिसरातील पैलवान बांधवांसाठी भव्य जंगी कुस्त्यांच्या फडाचे आयोजन करण्यात आले आहे.

मोफत आरोग्य तपासणीसाठी भक्ती मल्टिस्पशिलेटी हाॅस्पिटल नांदेडचे सुप्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ मुखेडचे भूमिपुत्र डॉ.अमोल कलेटवाड अंबुलगेकर,मेडिसिन डॉ.सौ. माया मैदेपवाड,डॉ. प्रमोद मस्के डॉ.राजेश सुर्वे उदयगिरी लाॅयन्स क्लब उदगीरचे डॉ.सुरेश तिवाडी,अस्थिरोगतज्ञ डॉ.पवन स्वामी राजूरकर यांच्यासह जिल्ह्याभरातील विशेषतज्ज्ञ डॉक्टरांची उपस्थिती लाभणार आहे.

या कार्यक्रमासाठी मुक्रामबाद व परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी कार्यक्रमात सहभागी होऊन मोफत आरोग्य सेवेचा लाभ घ्यावा व तसेच परिसरातील जास्तीत जास्त पैलवान बांधवांनी आयोजित कुस्त्यांच्या सामन्याचा सहभागी व्हावे असे आवाहन वाहन प्रमुख आयोजक भाजपा चे तालुका सरचिटणीस हेमंत आप्पा खंकरे,पैलवान सय्यद जलीलोदिन रफोदिन,ग्रा.प.सदस्य धोंडीबा घंटेलवाड, सरपंच देविदास राठोड,नागेश गोपनर,भाजपा तालुका उपाध्यक्ष विजयकुमार स्वामी, अविनाश पाटील कोटग्याळकर , नागनाथ पारशेवार, सरपंच आनंदराव गोजेगावे, पत्रकार सय्यद बाबा करिमोदिन, दादाराव गुमडे, भाजपा युवा मोर्चाचे जयपाल दापकेकर, सामाजिक कार्यकर्ते शेख मनान शरिफ , पांडुरंग सोळनर, रमेश राठोड व आ. डॉ तुषार राठोड मित्रमंडळ मुक्रामादच्या वत्तीने करण्यात आले आहे.

