कंधार। तालुक्यातील 16 ग्रामपंचायतीचा निकाल हाती आला असून सोळा पैकी बारा ग्रामपंचायती वर भाजपाचे वर्चस्व आले तर दोन बिनविरोध व इतर दोन ठिकाणी अपक्षाच्या हाती ग्रामपंचायत गेली आहे.
कंधार तालुक्यातील १६ ग्रामपंचायत मध्ये निवडणूक झाले त्यापैकी पाताळगंगा व गुलाबवाडी बिनविरोध करण्यात आली. तर गांधीनगर, घुबडवाडी, लालवाडी, जंगमवाडी, पोखरणी, नवरंगपुरा, सावरगाव, दिग्रस, कोटबाजार, उंमरज,सोमठाणा ,चौकी धर्मापुरी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला ग्रामपंचायत राखण्यात यश आलं तर इमामवाडी इतर पक्षाच्या ताब्यात गेल्या.
लोकशाहीचा कणा ठरणारा ग्रामपंचायत निवडणुकीचा निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते अटीतटीच्या लढतीमध्ये भारतीय जनता पार्टीने 16 पैकी 12 ग्रामपंचायतवर खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे वर्चस्व सिद्ध झाले. विजयी सरपंच व सदस्यांचा सत्कार भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशउपाध्यक्ष माजी जिल्हा परिषद सदस्य सौ.प्रणिताताई देवरे चिखलीकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रदेश कार्यकारी सदस्य बाबुराव केंद्रे, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष चित्ररेखाताई गोरे ,भाजपा तालुकाध्यक्ष भगवान राठोड ,उपनगरअध्य जाफ्रोद्दीन बाहोद्दीन, शहराध्यक्ष गंगाप्रसाद यन्नावार, युवा मोर्चा तालुकाअध्यक्ष साईनाथ कोळीगीरे ,
शहर सरचिटणीस मधुकर डांगे, युवा मोर्चा सरचिटणीस बालाजी तोरणे ,युवा मोर्चा कोशाध्यक्ष राजू मुकणार, सोशल मीडिया प्रमुख राजत शहापुरे, प्रदीप मंगनाळे, शिक्षक आघाडीचे राजहंस शहापुरे, माजी नगरसेवक चेतन केंद्रे ,उत्तमराव जाधव ,शिवाजी लुंगारे ,बालाजी पवार ,विश्वंभर बसवंते ,माजी नगरसेवक सुनील कंबळे, बाळू धुतमल, कैलास नावघरे,बालाजी तोटावड,ग्राम पंचायत भाजपा प्रभारी श्री.शाहुराज गोरे, श्री.उमेश पाटील, श्री.कैलाश नवघरे, श्री.विनोद तोरणे, श्री.राजु मुकनर, साईनाथ कोळगीरे बालाजी तोटवाड यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.