
किनवट, माधव सूर्यवंशी। किनवटच्या तालुका दंडाधिकारी तथा तहसीलदार सौ. मृणाल जाधव यांनी आपल्या मुलाचा पहिला वाढदिवस बोधडी येथील अंध विद्यार्थ्यासोबत साजरा करून सामाजिक बांधिलकी जोपासली असून जाधव यांनी सहकुटुंब अंध विद्यार्थ्यासोबत वाढदिवस साजरा करून समाजापुढे एक नवीन आदर्श निर्माण केला आहे.

किनवट तालुक्याच्या तहसीलदार सौ.मृणाल जाधव यांनी आपला मुलगा वीर याचा वाढदिवस अंध विद्यालयात साजरा केला यावेळी अंध शाळेतील विदयार्थी व संस्थेचे सचिव प्रकाश टारफे व विद्यालयाचे प्राचार्य वि. के.कांबळे ,दिलीप मुंडे, व इतर कर्मचारी वृंद उपस्थित होते.याप्रसंगी संगीत रजनी कार्यक्रमासह विद्यार्थी व विद्यार्थिनी सुरुची भोजनाचा आस्वाद घेतला.

