Tuesday, February 7, 2023
Home भोकर ताणतणाव, मानसिक आरोग्य तपासणी व उपचार शिबीर ग्रामीण रूग्णालय भोकर येथे संपन्न-NNL

ताणतणाव, मानसिक आरोग्य तपासणी व उपचार शिबीर ग्रामीण रूग्णालय भोकर येथे संपन्न-NNL

by nandednewslive
0 comment

भोकर। भोकर ग्रामीण रुग्णालय येथे दि.२०/१२/२०२२ रोजी मंगळवार या दिवशी सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत मानसिक आरोग्य विभाग नांदेड यांच्या मार्फत राबविण्यात आले. शिबीराचे प्रास्ताविक डॉ अशोक मुंडे वैद्यकीय अधिक्षक ग्रामीण रुग्णालय भोकर यांनी केले.

या शिबीरामध्ये प्रामुख्याने मानसिक आरोग्य, आत्महत्या प्रतिबंधात्मक कार्यक्रम, व्यसन समस्या व तसेच योग विषयक माहिती देऊन ६० रुग्णांची तपासणी केली व सल्ला दिला. याव्दारे संबंधित रूग्ण व जनसामान्यांना त्यांच्या आरोग्य विषयक अडचणी विषयी बहुमोल मार्गदर्शन व अनेक मनोरोग वर उपचार डॉ शाहू शिराढोणकर मानसोपचार तज्ञ यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सत्यजीत टिप्रेसवार आरोग्य सहाय्यक यांनी केले.

नांदेड येथील वंदना कसपटे समुपदेशक, अरूण वाघमारे वैद्यकिय सामाजिक कार्यकर्ता, ग्रामीण रुग्णालय भोकरचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.अशोक मुंडे, डॉ.नितीन कळसकर, डॉ आर्शिया शेख, डॉ.सागर रेड्डी,डॉ.राजाराम कोळेकर, सत्यजीत टिप्रेसवार, मनोज पांचाळ, गंगामोहन शिंदे, अत्रिनंदन पांचाळ, संजय देशमुख, साबेर पाशा, संदिप ठाकूर, पांडुरंग तम्मलवाड, श्रीमती भालेराव, रेणुका भिसे ग्रामीण रूग्णालयातील अधिकारी, कर्मचारी व रुग्ण उपस्थित होते.

संबंधित बातम्या वाचा

Leave a Comment

nandednewslive.com या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेत स्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Visitor counter NNL

Copyright @ 2011-2023 Online Social News Live Channel All Right Reserved -Developed & Designed by M&D Infotech Latur, Call – 86687 76434 

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
error: Content is protected !!