
उस्माननगर, माणिक भिसे| येथील ” स्वच्छता, आरोग्य,शिक्षण या मुलभूत सोयी सुविधा कडे लक्ष द्या ” या मथळ्याखाली वृत्त दि.१८ डिसेंबर रोजी नांदेड न्यूज लाईव्ह मध्ये प्रकाशित होताच ग्रामपंचायत कार्यालयातील अधिकारी, सरपंच खरबडून जागे झाले. आणि तात्काळ मनावर घेऊन गावातील मुख्य रस्त्यावरील नालीतील घाण व कचरा उचलण्यासाठी सुरूवात केली आहे. यामुळे व्हाटस्प ग्रुपमध्ये सुजाण नागरिकांकडून नांदेड लाईव्ह व ग्रामपंचायतचे आभार व अभिनंदन व्यक्त केले जात आहे.

उस्माननगर येथे अनेक दिवसांपासून आरोग्य शिक्षण रस्ते स्वच्छाता या मुलभूत सोयी सुविधा कडे लक्ष देण्याकडे संबंधित अधिकारी, ग्रामपंचायत सरपंच , पॅनल प्रमुख, यांचे कानाडोळा केला जातो. निवडणुक्याच्या वेळी हे नेते मंडळी घरोघरी जाऊन मतदारांना मोठ्या मोठ्या प्रमाणात विकास कामांसाठी पोकळ आश्वासने देऊन मते मिळवून घेतात. निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाकडे नजर फिरवली जाते. प्रत्येक वार्डातून सदस्य निवडले जातात की, गल्लीतील समस्या ग्रामपंचायत सदन मध्ये मांडून कामे केली जातात.

पण सन्माननीय सभासद या मुलभूत सोयी सुविधा कडे लक्ष देण्याऐवजी निरंकर गप्पा मारल्या जात असल्याचे सांगितले जाते. निवडून आलेले सभासद बैठकीला दांडी मारतात यांची सुध्दा कुजबुज ऐकावयास मिळते. मागील अनेक वर्षांपासून स्वच्छतेसाठी कायम स्वरुपी कामगार नसल्यामुळे सरपंच श्रीमती गयाबाई घोरबांड, ग्रामसेविका सौ.शिंदे , कारकुन आमिनशा फकीर , अशोक काळम पाटील, दत्ता पाटील घोरबांड हे रोजाने मजदूर लावून गावची स्वच्छतेसाठी तळमळीने झटत असल्याचे दिसून येतात. नालीतील ओला व सुका कचरा (घाण) भरून काढण्यासाठी रोजाने मजदूर व भरून नेण्यासाठी ट्रॅक्टर लावल्या जाते.

गावातील नाली स्वच्छता आरोग्य चांगले राहण्यासाठी सरपंच श्रीमती गयाबाई घोरबांड व ग्रामसेविका सौ.डि.जी.शिदे – माने यांच्या मार्गदर्शनाखाली आमिनशा फकीर, अशोक काळम पाटील, दत्ता पाटील घोरबांड हे गावातील सोयी सुविधा कडे लक्ष देत असल्याचे सांगण्यात आले आहे. नांदेड न्युज लाइव्ह मध्ये दि.१८ डिसेंबर रोजी याबाबतची बातमी प्रकाशित होताच ग्रामपंचायत खळबळून कामाला लागल्याने गावकऱ्यांनी कौतुक व व्हाटस्प ग्रुपमध्ये सुजाण नागरिक अभिनंदन करित आहेत.

घंटागाडी ची व्यवस्था करा
उस्माननगर ग्रामपंचायत कार्यालय यांच्या वतीने दरोरोज गावातील गल्लोगल्ली फिरण्यासाठी घंटा गाडी चालू करावी. रोजाने ट्रॅक्टर लावण्यापेक्षा घंटागाडी चालू करा अशी मागणी पुढे येत आहे.
