
नांदेड| येथील प्रसिध्द उद्योजक तथा भारत स्वाभिमान ट्रस्ट चे जिल्हा संघटन मंत्री श्री.पंढरीनाथ कंठेवाड यांनी पतंजली योगपीठ,हरिव्दार ला 1 लाख रू. ची दानराशी देऊन आजिवन सभासदत्वाचा पहिल्यांदा मान मिळविला.

याबाबत सविस्तर वृत असे की, प.पु.योगऋषी स्वामी रामदेवजी महाराज यांच्या पतंजली योगपीठास 1 लाख रू.दानराशी देऊन हरिव्दार येथील योगपीठातील सेवाकार्य गोशाळा,गुरूकुल,निःशुल्क योगसेवा अश्या शेकडोंशी सेवाकार्य कल्याणार्थ हि दानराशी योगऋषी स्वामी रामदेवांच्या गुरूचरणी अर्पण करण्यासासाठी नांदेड जिल्हा कोअर कमिटी चे भा.स्वा.ट्र. जिल्हाध्यक्ष रामजी शिवपनोर,प.यो.स.जिल्हाध्यक्ष सुरेश लंगडापुरे,जिल्हा कोषाध्यक्ष महारूद्रजी माळगे यांच्याकडे 1लाख रू.चे चेक सुपूर्द केले.

ह्या दानराशीमुळे पतंजली योगपीठाचे आजिवन सभासदत्वाच्या रूपातुन त्यांना आ जिवनभर पंचकर्म,षटकर्म निसर्गोपचार मोफत दिल्या जातात वर्षातुन 1 वेळा 7 दिवस एकाच व्यक्तीस गुरूपोर्णिमा उत्सव दिनी योगऋषी स्वामी रामदेव महाराजांचा प्रत्यक्ष आशीर्वाद,मार्गदर्शन व उपचार मिळतो.तरी जिल्ह्यातील सर्व योगप्रेमींना भारत स्वाभिमान ट्रस्टचे जिल्हाध्यक्ष रामजी शिवपनोर व संघटनमंत्री पंढरीनाथ कंठेवाड यांनी आजिवन सभासद होण्याचे आवाहन केले आहे.

