
नविन नांदेड। नांदेड तालुक्यातील व दक्षिण विधानसभा मतदारसंघातील सर्वात मोठ्या असलेल्या बळीरामपुर ग्रामपंचायत थेट जनतेतुन संरपचपदचा निवडणुकीत संरपचपदी अपक्ष उमेदवार सौ.रेणुका इंद्रजित पांचाळ तर ग्रामपंचायत सदस्य पदासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य आंंनद गुंडीले यांच्या ग्रामविकास पनलला ७ व अपक्ष ८ वंचित बहुजन आघाडीला दोन असे १७ सदस्य निवडून आले आहेत, या झालेल्या निवडणुकीत धक्कादायक निकाल लागल्याने प्रस्थापित यांना धक्का बसला असुन विजयी उमेदवार यांच्ये ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले आहे.

बळीरामपुर ग्रामपंचायत निवडणूक साठी ७ उमेदवार संरपचपदासाठी तर १७ ग्रामपंचायत सदस्य साठी ८५ उमेदवार निवडणूक रिंगणात होते,१८ डिसेंबर रोजी झालेल्या मतदान निवडणूक मध्ये ६३ टक्के मतदान झाले होते. २० रोजी नांदेड येथील उपविभागीय कार्यालय येथे जिल्हाधिकारी तहसीलदार किरण अंबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक निर्णय अधिकारी गजानन नांदेडकर यांच्या अधिपत्याखाली मतमोजणी करण्यात आली. यावेळी संरपचपदासाठी अपक्ष उमेदवार रेणुका इंद्रजित पांचाळ १७५५ मते घेऊन विजयी झाल्या तर प्रतिस्पर्धी मिना रमेश जैस्वाल यांच्या सह सहाजणाचा पराभाव केला.

वार्ड क्रमांक १ मध्ये वाघमारे नागेश प्रभाकर ३६७, शेख जाकीर खाजा ३२४, फुले शांताबाई विश्वाभंर ४८९, वार्ड क्रमांक २ मध्ये भंडारे रविंद्र शामराव ४३६, अंबटवार नागोराव दिंगाबर,३८०,डुमणे शांताबाई ३०२, वार्ड क्रमांक ३ मध्ये गडपवार नरसिंग संग्राम ३०२,आढाव वैशाली संभाजी ३५८, वार्ड क्रमांक ४ गव्हाणे किशन नारायण २१९,शितल साहेबराव चिते ४०७,डोईबळे आरती रवी २६४, वार्ड क्रमांक ५ वाघमारे अशोक आंनदा २६५,चौदंते पुजा राहुल ४९९,दासवाड भारतबाई ज्ञानोबा ५२९ वार्ड क्रमांक ६ मध्ये सोनकांबळे कपिल मधुकर३६९,तेलंग अनिता संतोष ३३४, शिंदे वंदनाबाई बालाजी ३९७ हे सतरा उमेदवार विजयी झाले.

विजयी झाल्यानंतर बळीरामपुर ग्रामस्थांनी पुष्पहार घालून फटाक्यांच्या आतिषबाजी मध्ये संरपच व ग्रामपंचायत सदस्य यांच्ये स्वागत केले तर ग्रामीण पोलीस स्टेशन चे पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड यांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी गावात कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. या निवडणुकीत धक्का दायक निकाल लागल्याने प्रस्थापितसह विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकारी यांना धक्का बसला असुन संरपच सौ.पांचाळ यांनी गावाच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.

