मुखेड, रणजित जामखेडकर| शेतकर्यांच्या विविध मागण्यासाठी रस्त्यावर उतरुन सरकार व प्रशासनाला जवाब विचारणारे शेतकरी पुञ बालाजी पाटील ढोसणे यांना महाराष्ट्र शासन जिल्हा परीषद नांदेड कडुन २०२२-२३ वर्षासाठीचा डाँ.शंकरराव चव्हाण कृषिनिष्ठ शेतकरी पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
महाराष्ट्र शासन जिल्हा परीषद नांदेड यांच्या तर्फे दरवर्षी शेतकर्यांच्या न्याय हक्कासाठी लढा देणार्या व्यक्तीला डाँ.शंकरराव चव्हाण कृषिनिष्ठ पुरस्कार देण्यात येतो.सदरील पुरस्कारासाठी तालुका स्तरावरुन गटविकास अधिकारी यांच्या मार्फत प्रस्ताव पाठवला जातो. या प्रस्तावा आधारेच व्यक्तीची निवड केली जात असुन २०२२-२३ या वर्षासाठीचा पुरस्कार शेतकर्यासाठी अहोराञ परिश्रम घेतात.
पिक विम्याचे गाढे अभ्यासक,शेतकरी पुञ बालाजी पाटील ढोसणे यांना देण्यात येणार असुन सदर पुरस्कार हा २२ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता कृषि प्रदर्शन माळेगांव याञेमध्ये दिला जाणार आहे.दरम्यान सदरील पुरस्कार बालाजी पाटील ढोसणे यांना जाहीर झाल्याबद्दल त्यांचे राजकीय व सामजीक क्षेञातील मान्यवरांकडुन स्वागत हौत आहे.