Thursday, February 2, 2023
Home भोकर रग्बी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी नांदेड जिल्ह्यातील दोन खेळाडूची महाराष्ट्र रग्बी संघात निवड…NNL

रग्बी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी नांदेड जिल्ह्यातील दोन खेळाडूची महाराष्ट्र रग्बी संघात निवड…NNL

by nandednewslive
0 comment

नांदेड। नेरळ जिल्हा रायगड या ठिकाणी वयोगट १४ वर्षातील मुलीच्या संघात या खेळाडूंनी कर्णधार व उपकर्णधार म्हणून खेळाची पारी सांभाळत खेळ खेळत व्यवस्थित रित्या आपल्या संघाला सेमी फायनल पर्यंत पोहोचवले तसेच पहिलाच गोल करून आपल्या संघाला खेळ प्रदर्शन चांगल्या रीतीने करत असताना त्याच कामगिरीच्या बदल्यात त्या दोघींची महाराष्ट्र रग्बी निवड चाचणी सरावासाठी निवड झाली होती.

महाराष्ट्र निवड प्रशिक्षण शिबिर दि.१६ ते १९ दरम्यान नंदुरबार जिल्हा येथे चालू असताना त्यामध्ये महाराष्ट्र भरातून आलेल्या खेळाडूंमध्ये नांदेड जिल्ह्यातील (केंद्रीय विद्यालय एस सी आर नांदेड) कु.आदिती प्रवीणराव बोरकर, (विमल इंग्लिश स्कूल भोकर) कु.किंजल गोविंद थोरात या दोन खेळाडू मुलींची रग्बी फुटबॉल महाराष्ट्र संघात निवड झाली असून दि. २१ ते २३ रोजी अहमदाबाद, गुजरात राज्य येथे होणाऱ्या राष्ट्रीय रग्बी स्पर्धेत भारतभरातून आलेल्या सर्व संघासोबत या दोन मुली आपल्या संघासोबत महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करणार आहे.

या यशाबद्दल सार्वत्रिक त्या दोघींचे कौतुक केले जात आहे महाराष्ट्र संघात स्थान मिळवल्याबद्दल नांदेड जिल्हा रग्बी संघटनेचे महासचिव प्रलोभ जी एम कुलकर्णी, संघटनेचे पदाधिकारी, भोकर तालुक्यातील पत्रकार, उत्तम जी बाबळे , सदान्शु कांबळे, पत्रकार पडोळे आदी मान्यवर यांनी खेळाडूचे अभिनंदन केले.

banner

तसेच या खेळाचे मुख्य क्रीडा प्रशिक्षक बालाजी गाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे खेळाडू प्रशिक्षण घेत होते यातच एक फळ म्हणून ते खेळाडू राष्ट्रीय स्पर्धेपर्यंत पोहोचले त्याबद्दल प्रशिक्षक तसेच त्या खेळाडूंचे सार्वत्रिक कौतुक केले जात आहे इतर सर्व रग्बी खेळाडू तसेच सीनियर रग्बी खेळाडू कु.पार्वती चव्हाण, कु.राणी जाधव , तसेच स्वर्गीय राज्यस्तरीय उत्कृष्ट रग्बी खेळाडू सुमित विनोद सुरदसे याच्या प्रेरणेतून रग्बी या खेळाला प्रेरणादायी वळण मिळाले आहे.

राष्ट्रीय स्पर्धेत लागलेल्या या दोन शाळकरी मुलींना सर्व खेळाडू, पदाधिकारी, हितचिंतक या सर्वांनी राष्ट्रीय रग्बी संघात निवड झाल्या बद्दल अभिनंदन केले व पुढील राष्ट्रीय रग्बी क्रीडा स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आले आहे

संबंधित बातम्या वाचा

Leave a Comment

nandednewslive.com या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेत स्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो नांदेड न्यायालयांतर्गत राहील.

Visitor counter NNL

Copyright @ 2011-2023 Online Social News Live Channel All Right Reserved -Developed & Designed by M&D Infotech Latur, Call – 86687 76434 

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
error: Content is protected !!