
उस्माननगर। येथून जवळच असलेल्या मौजे आलेगाव ता.कंधार येथील प्रगतिशील शेतकरी प्रशांत शंकरराव मोरे यांना नुकताच नांदेड जिल्हा परिषद अंतर्गत डॉ शंकरराव चव्हाण कृषिनिष्ठ शेतकरी पुरस्कार जाहीर झाला आहे.


जिल्ह्यात सोशल मीडियावर व प्रत्यक्ष किंवा थेट बांधावरून नांदेड आकाशवाणीच्या माध्यमातून अनेक वेळेस शेती विषयक मार्गदर्शन व चर्चासत्र, विविध शेती अवजारे, बी-बीयाणे, खते, सेंद्रिय शेती याविषयीची सतत माहिती आपल्या गुपच्या माध्यमातून व शेतकऱ्यांना थेट बांधावर जाऊन देत असतात.तसेच प्रशांत मोरे यांनी नोकरीच्या मागे न लागता व वेळ वाया न जाऊ देता आपल्या शेतात भावाला व घरातील महीलाना सोबत घेऊन रात्रन दिवस काबड कष्ट करून शेतात विविध प्रकारच्या जातींच्या भाजी, पाला, फळाची पिके घेऊन पिकवली. विविध प्रयोग करून शेतात पिके जोमाने घेतले. या नाविन्यपूर्ण उपक्रम शिल शेतकऱ्यांच्या कार्याची दखल घेऊन नांदेड जिल्हा परिषदेने २०२२ – २३ चा डॉ शंकरराव चव्हाण कृषीनिष्ठ शेतकरी पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आल्याचे एका पत्रकाद्वारे जाहीर केला आहे.


या पुरस्कार सोहळ्याचे वितरण दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेली सुप्रसिद्ध माळेगांव ता.लोहा येथील जगप्रसिद्ध यात्रा येथे दिनांक २२-१२-२०२२ रोजी पासुन प्रारंभ होणार आहे. याच दिवशी कृषी प्रदर्शनाच्या भव्य दिव्य कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. या सदरील कार्यक्रमात त्यांचा पुरस्कार देऊन सहपत्नीक सम्मान केला जाणार आहे. प्रगतशिल शेतकरीपुत्र प्रशांत शंकरराव पाटील मोरे यांना डॉ शंकरराव चव्हाण कृषीनिष्ठ शेतकरी पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल तालुक्यातील मित्र परिवार, शेतकऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

